AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंचा टोलनाक्यावर रुद्रावतार; सिद्धार्थ जाधवने सांगितला विलक्षण अनुभव

नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमानंतर मुंबईला परतताना खालापूर टोलनाक्याजवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा रुद्रावतार पहायला मिळाला. अभिनेता सिद्धार्थ जाधवने हा अनुभव सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारे सांगितला. सिनेमात हिरो असतात, पण राजसाहेब हे खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत, असं तो म्हणाला.

राज ठाकरेंचा टोलनाक्यावर रुद्रावतार; सिद्धार्थ जाधवने सांगितला विलक्षण अनुभव
Siddharth Jadhav and Raj ThackerayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 11:22 AM

मुंबई : 8 जानेवारी 2024 | पिंपरी-चिंचवडमध्ये नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याच गाडीतून मुंबईला परतत होता. यावेळी खालापूर टोलनाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा उभ्या होत्या. या ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिकासुद्धा अडकली होती. त्यावेळी राज ठाकरे स्वत: गाडीतून उतरले आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना गाड्या सोडण्यास सांगितलं. राज ठाकरेंनी आपल्यात भाषेत त्या कर्मचाऱ्यांना खडसावलं होतं. हा अनुभव अभिनेता सिद्धार्थ जाधवने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला.

सिद्धार्थ जाधवने सांगितला अनुभव

“राज ठाकरे यांच्यासोबत मी पुण्यापासून मुंबईपर्यंत प्रवास करत होतो. नाट्य संमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याबरोबर आम्ही प्रवास करत होतो. एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याला त्यांनी ट्रॅफिकची रांग पाहिली. राज ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. आम्ही त्यांच्याच गाडीत बसलो होतो. साहेबांची गाडी, पोलिसांची व्हॅन यांना ट्रॅफिकमधून रस्ता करून दिला होता. पण त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला काही कळायच्या आत ते गाडीतून उतरले. राज ठाकरेंनी तिथल्या कर्मचाऱ्यांना आपल्या भाषेत समजावलं की आताच्या आता सगळ्या गाड्या सोडा. वाहनांची रांग चार ते पाच किलोमीटर होती आणि त्यात रुग्णवाहिकासुद्धा अडकली होती. साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेच गाड्या सोडण्यात आल्या,” असं त्याने सांगितला.

हे सुद्धा वाचा

“एवढं करून ते थांबले नाहीत. तर ती रुग्णवाहिका त्या ट्रॅफिकमधून निघेपर्यंत साहेब तिथेच उभे होते. निघताना पण त्यांनी कर्मचाऱ्यांना इशारा दिला की इथे एकही गाडी थांबली नाही पाहिजे. पुढेही प्रत्येक टोलनाक्याला थांबून जिथे जिथे ट्रॅफिक अडवून ठेवलं होत, रांगाच्या रांगा लागल्या होत्या, तिथे उतरून त्यांनी खडसावून सांगितलं. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. सकाळीच मी नाट्यसंमेलनातील त्यांची मुलाखत पाहिली होती. त्यात कलाकारांविषयी ते ज्या आत्मीयतेने बोलत होते, तेसुद्धा भावलं होतं. फक्त बोलून नव्हे तर कृतीतूनही ते मनं जिंकतात. सिनेमात हिरो असतात, पण राजसाहेब हे खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत,” असं तो पुढे म्हणाला. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही सोशल मीडियावर सिद्धार्थचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.