Sidharth Kiara Wedding | सिद्धार्थ-कियारा अडकले लग्नबंधनात; सूर्यगढ पॅलेसमध्ये धूमधडाक्यात पार पडला विवाहसोहळा

सोमवारपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. सोमवारी संध्याकाळी या दोघांचा संगीत कार्यक्रम पार पडला. सोशल मीडियावर सूर्यगढ पॅलेसचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Sidharth Kiara Wedding | सिद्धार्थ-कियारा अडकले लग्नबंधनात; सूर्यगढ पॅलेसमध्ये धूमधडाक्यात पार पडला विवाहसोहळा
Kiara and SidharthImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 6:19 PM

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. आज (मंगळवार) दुपारी जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत सिद्धार्थ-कियाराने लग्नगाठ बांधली. सोमवारपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. सोमवारी संध्याकाळी या दोघांचा संगीत कार्यक्रम पार पडला. सोशल मीडियावर सूर्यगढ पॅलेसचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

मंगळवारी सकाळी सिद्धार्थ-कियाराची हळद पार पडली. त्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास विवाहविधींना सुरुवात झाली. आज संध्याकाळी रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. या लग्नसोहळ्याला शाहिद कपूर, मीरा राजपूत, जुही चावला, इशा अंबानी, मनिष मल्होत्रा यांनी हजेरी लावली.

हे सुद्धा वाचा

पंजाबी स्टाइलमध्ये वरात घेऊन पोहोचला सिद्धार्थ

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी दिल्लीहून बँडवाले आले होते. या वरातीसह पंजाबी स्टाइलमध्ये सिद्धार्थने मंडपात एण्ट्री केली. मंगळवारी दुपारपासून या लग्नाचे अपडेट्स समोर येत आहेत. सिद्धार्थने ‘साजन जी घर आए’ या गाण्यावर मंडपात एण्ट्री केली.

सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी

सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली.

जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी 84 आलिशान रुम्स बुक करण्यात आले आहेत. तर लग्नाला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी 80 गाड्यांचीही सुविधा करण्यात आली आहे. या पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागणार आहे. जेणेकरून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ शकणार नाहीत. याआधी बऱ्याच सेलिब्रिटींच्या लग्नात ‘नो फोन पॉलिसी’चं काटेकोरपणे पालन करण्यात आलं होतं.

2010 मध्ये करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून सिद्धार्थला लाँच केलं. तर कियारा अडवाणीने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघं त्यांच्या रिलेशनशिपविषयी कधीच माध्यमांसमोर व्यक्त झाले नाहीत. मात्र बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये किंवा सहलींवर जाताना दोघांना नेहमीच एकत्र पाहिलं गेलं.

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये कियारा पहिल्यांदाच तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली होती. “आम्ही लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये सहज बोलू लागलो होतो. तेव्हाच आम्ही पहिली भेट झाली होती. ती भेट अगदी सहज होती. मात्र तो दिवस मी कधीच विसरणार नाही”, असं ती म्हणाली होती.

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.