नशेमध्ये उद्ध्वस्त झालं ‘या’ सेलिब्रिटींचं आयुष्य; दोघांनी गमावले प्राण

कपिल शर्मा याच्यापासून ते आदित्य सिंह राजपूत याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींच नशेमुळे उद्ध्वस्त झालं आयुष्य... 'या' सेलिब्रिटींनी पुनर्वसन केंद्र जावून स्वातःला सावरलं

नशेमध्ये उद्ध्वस्त झालं 'या' सेलिब्रिटींचं आयुष्य; दोघांनी गमावले प्राण
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 2:46 PM

मुंबई : अंमली पदार्थांचे व्यसन लागलं की त्यातून बाहेर येणं फार कठीण आणि काहींसाठी तर अशक्यही होते… टीव्ही आणि बॉलीवूडविश्वातील असे काही सेलिब्रिटी आहेत, जे ड्रग्सच्या आहारी गेले आणि ज्यामुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.. पण स्वतःवर ताबा ठेवून काही सेलिब्रिटींनी स्वतःला सावरलं, तर काहींनी मात्र प्राण गमावले.. या यादीत आदित्य सिंग राजपूतपासून कपिल शर्मा आणि सुशांत सिंग राजपूतपर्यंतचा समावेश आहे. तर आज जाणून घेवू अशा सेलिब्रिटींबद्दल ज्यांचं आयुष्य नशेमुळे उद्ध्वस्त झालं…

अभिनेता कपिल शर्मा – अभिनेता आणि कॉमेडीयन कपिल शर्मा याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. कपिलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. कपिल शर्माने ड्रग्जच्या व्यसनात आयुष्य आणि करिअरही उद्ध्वस्त केलं होतं. मात्र वेळीच पुनर्वसन केंद्रात जाऊन त्यांने स्वतःला सावरलं…

अभिनेता आदित्य सिंह राजपूत – मुंबईतल्या अंधेरी इथल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. 32 वर्षीय आदित्यच्या मृत्यूप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. त्याचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झालं, असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला असं काही रिपोर्ट्स म्हणतायत.

हे सुद्धा वाचा

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला – ‘बिग बॉस 13’ मध्ये पारस छाबरा यांने सिद्धार्थ शुक्ला खूप नशेत असल्याचे उघड केलं होते. नशेमुळे त्याचा संयम सुटू लागला होता. मात्र, नंतर त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं.. जीममध्ये हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अभिनेत्याचं निधन झालं.. त्याच्या निधनानंतर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला…

अभिनेता सुशांत सिंह राजपूत – सुशांत सिंग राजपूतबद्दल असे म्हटले जाते की, अभिनेता ड्रग्जच्या आहारी गेला होता. एनसीबीला दिलेल्या माहितीमध्ये रिया चक्रवर्ती म्हणाली होती की, मला भेटण्यापूर्वी पासून सुशांत ड्रग्स घेत होता.. सुशांत याच्या निधनामुळे सर्वत्र मोठी खळबळ माजली होती.. (sushant singh rajput)

अभिनेत्री मनिषा कोईराला – मनिषा कोईराला तिच्या पुस्तकात लिहिलं होतं की, अभिनेत्री अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती. मनिषा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते…

दरम्यान, अभिनेता आदित्य सिंह राजपूत निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. आदित्यच्या निधनाचं नेमकं कारण त्याच्या शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होईल.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.