Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवालाचं SYL गाणं प्रदर्शित; अवघ्या काही तासांत मिळाले तब्बल इतके व्ह्यूज

युट्यूबवर हे गाणं प्रदर्शित होताच त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. अनेकांनी सिद्धूसाठी भावनिक मेसेज लिहिले आहेत. 'SYL' हे गाणं सिद्धूनेच लिहिलं, गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं.

Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवालाचं SYL गाणं प्रदर्शित; अवघ्या काही तासांत मिळाले तब्बल इतके व्ह्यूज
Sidhu Moose WalaImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 9:12 AM

पंजाबी गायक (Punjabi Singer) सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येच्या तीन आठवड्यांनंतर त्याचं ‘SYL’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. सिद्धूचं हे शेवटचं गाणं ठरलंय. त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. युट्यूबवर हे गाणं प्रदर्शित होताच त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. अनेकांनी सिद्धूसाठी भावनिक मेसेज लिहिले आहेत. ‘SYL’ हे गाणं सिद्धूनेच लिहिलं, गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं. त्याच्या हत्येच्या काही आठवड्यांपूर्वी हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं होतं. सिद्धूची अजूनही काही गाणी अद्याप प्रदर्शित करण्यात आली नाहीत. 29 मे रोजी पंजाबमधल्या मनसा जिल्ह्यातील एका गावात सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली.

सिद्धूच्या या गाण्याला युट्यूबवर अवघ्या 30 मिनिटांत दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर गेल्या 14 तासांत एक कोटींहून अधिक व्ह्यूज आणि दोन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. ‘सिद्धू अजूनही आपल्यात आहे, हे गाणं त्याचा पुरावा आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘सिद्धूचा आवाज आजही जिवंत आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

सिद्धूचं गाणं-

हे सुद्धा वाचा

8 मे रोजी पंजाबी ग्लोबल फाऊंडेशनच्या गुरप्रीत कौर चढ्ढा यांनी मुंबईत दिवंगत गायक सिद्धू मूसेवालासाठी प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. प्रार्थनेच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना सिद्धूचे वडील भावूक झाले होते. “माझ्या मुलाचा काय दोष होता, ज्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असं ते म्हणाले.

सिद्धूच्या हत्येप्रकरणी पंजाबपासून दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तरप्रदेश इतकंच नव्हे तर कॅनडापर्यंतचं कनेक्शन समोर आलं आहे. हत्येपूर्वी सिद्धूच्या घराबाहेर रेकी करताना आणि हत्येनंतर धावत्या गाड्यासुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. सिद्धूच्या हत्येनंतर आरोपींनी जी ऑल्टो कार लुटली होती, पोलिसांन तीसुद्धा जप्त केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.