Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Armaan Malik | दोन्ही पत्नी एकत्र प्रेग्नंट असलेल्या युट्यूबर अरमान मलिकवर भडकला प्रसिद्ध गायक

2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत.

Armaan Malik | दोन्ही पत्नी एकत्र प्रेग्नंट असलेल्या युट्यूबर अरमान मलिकवर भडकला प्रसिद्ध गायक
Youtuber अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकत्र प्रेग्नंटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:58 AM

मुंबई : हैदराबादचा प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. युट्यूबर अरमान त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. कारण त्याच्या दोन पत्नी आहेत आणि दोन्ही पत्नींसोबत तो एकाच घरात राहतो. इतकंच नव्हे तर या दोघी जणी एकाच वेळी गरोदर राहिल्या आहेत. अरमान मलिकच्या युट्यूब व्हिडीओमध्ये या दोघीजणी नेहमी एकत्र दिसतात. युट्यूबवर त्याच्या सबस्क्राइबर्सची संख्याही मोठी आहे. मात्र युट्यूबर अरमान मलिकमुळे प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिकला वेगळाच त्रास सहन करावा लागतोय. अखेर चिडलेल्या गायक अरमानने याविषयी ट्विट केलं आहे.

‘मीडियामध्ये त्याला अरमान मलिक बोलणं थांबवा. त्याचं खरं नाव संदीप आहे. कृपया माझ्या नावाचा गैरवापर करू नका. रोज सकाळी उठून असे आर्टिकल वाचण्याचा मला राग येतोय. अशा बातम्यांमुळे माझी खूप चिडचिड होतेय’, असं ट्विट गायक अरमान मलिकने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

युट्यूबर संदीप हा इंटरनेट सेन्सेशन आहे, जो स्वत:चं नाव अरमान मलिक आहे असं सांगतो. मात्र हे त्याचं खरं नाव नाही. त्याने जेव्हा आपल्या दोन लग्नांविषयी युट्यूबवर सांगितलं, तेव्हापासून तो रातोरात प्रकाशझोतात आला. आता गायक अरमानच्या ट्विटनंतर संदीपने उत्तर देत एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की त्याने कधीच नाव कॉपी केलं नाही. त्याची पत्नी कृतिकानेही त्याला दुजोरा दिला आहे.

“अरमान मलिक नावाचा काही पेटंट नाही. त्यामुळे दोन लोकांची नावं एकच असू शकतात. जर आमच्यामुळे तुमची चिडचिड होत असेल तर आम्हालाही तुम्हाला पाहायचं नाहीये. तुमच्या घरातील सर्वजण बॉलिवूडशी निगडीत आहेत, म्हणून तुम्ही गायक बनलात. मी खूप मेहनत घेतली आहे. ब्लॉगिंग केलंय, टिकटॉक केलंय, तेव्हापासून माझं नाव अरमान मलिक आहे”, असं त्याने या व्हिडीओ म्हटलंय.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.