डोक्याला दुखापत, दोन बोटे तर…, कॉन्सर्ट सुरु असताना गायकासोबत मोठा अपघात
कॉन्सर्ट सुरु असताना गायकासोबत मोठा अपघात; प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना अचानक असं काय झालं ज्यामुळे गायक गंभीर जखमी... सध्या सर्वत्र गायकाच्या अपघाताचीच चर्चा
चेन्नई : ‘आदत से मजबूर’, ‘बदतमीज दिल’ आणि ‘गेट रेडी टू फाइट’ यांसारखी अनेक गाणी गाणाऱ्या गायकाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघाता गायक गंभीर जखमी देखील झाला आहे. चेन्नई याठिकाणी सुरु असलेल्या कॉन्सर्ट दरम्यान बॉलीवूड गायक बेनी दयाल (Benny Dayal) याचा अपघात झाला आहे. अपघातात बेनी दयाल याच्या डोक्याला दुखापत झाली असून, गायकाची दोन बोटे देखील कापली आहेत. ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. बेनी दयाल याचा अपघात झाल्याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सर्वत्र बेनी दयाल याच्या अपघाताची चर्चा होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांपैकी एक असलेल्या बेनी दयाल हा प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना त्याचा अपघात झाला. ज्याठिकाणी बेनी दयाल याचा कार्यक्रम सुरु होता, त्याठिकाणी ड्रोनने शुटिंग सुरु होतं. ड्रोन अचानक गायकाच्या डोक्यावर पडल्यामुळे बेनी दयाल याला दुखापत झाली आहे. खुद्द बेनी दयाल याने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत अपघाताबद्दल मोठी अपडेट दिली.
बोनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने घडलेल्या अपघाताबद्दल सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये बेनी दयाल म्हणतोय, ‘डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे.’ शिवाय बेनी दयाल याने कापलेली बोटे देखील दाखवली आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून बेनी दयाल शोच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला देताना देखील दिसत आहे.
View this post on Instagram
बेनी दयाल म्हणाला, ‘प्रत्येक कलाकाराने लक्ष ठेवायला हवं की, ड्रोन आपल्या अधिक जवळ तर येत नाही ना… शोच्या कार्यकर्त्यांनी देखील या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. जो व्यक्ती ड्रोन उडवत तो अनुभवी असायला हवा.. आम्ही फक्त कलाकार आहोत. आम्ही स्टेजवर फक्त आणि फक्त गाणी गाण्यासाठी उभे असतो. आम्ही विजय, अजय, सलमान खान आणि प्रभास नाही आणि आम्ही स्टन्ट देखील करत नाही…’ असं देखील बेनी दयाल अपघातानंतर म्हणाला आहे.
बेनी दयाल याच्या व्हिडीओवर अनेक चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. एक चाहता म्हणाला, ‘तू लवकर ठिक होशील… कार्यक्रमादरम्यान अशी घटना घडली यावर विश्वास बसत नाही..’, तर अन्य एक चाहता म्हणाला, ‘मोर पॉव्हर टू यू…. काळजी घे बेनी..’ सध्या बेनी दयाल याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.