KK: प्रसिद्ध गायक केके कोलकात्यातल्या लाईव्ह फरफॉर्मन्सनंतर कोसळला, उपचाराआधीच मृत्यू, ‘तडप तडप’ ते याद आयेंगे वो पल, गाणारा आवाज काळाच्या पडद्याआड

त्यांच्या आवाजासाठी त्यांचे लाखो चाहते घायळ आहेत. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने गायन विश्वावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.

KK: प्रसिद्ध गायक केके कोलकात्यातल्या लाईव्ह फरफॉर्मन्सनंतर कोसळला, उपचाराआधीच मृत्यू,  'तडप तडप' ते याद आयेंगे वो पल, गाणारा आवाज काळाच्या पडद्याआड
प्रसिद्ध प्‍लेबैक सिंगर केकेंचं निधनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:16 AM

कोलकाता : प्रसिद्ध प्‍लेबैक सिंगर केकेंचं (Singer Kk Dies) निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे गायन विश्वातील आणखी एक सितारा हरपला आहे. त्यांच्या आवाजासाठी त्यांचे लाखो चाहते घायळ आहेत. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने गायन विश्वावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. कृष्णकुमार कुन्नाथ असे त्यांचे पूर्ण नाव आहे. 23 ​​ऑगस्ट 1968 त्यांचा जन्म झाला होता. ते केके म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. त्यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली (KK Songs) आहेत. ते त्यांच्या पिढीतील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. आज कोलकाता येथील नझरूल मंच येथे संगीत कार्यक्रमाच त्यांचे निधन झाले. केके यांचं हम दिल दे चुके सनम मधलं, तडप तडप के इस दिल.. (Tadap Tadap Ke Is Dil) ….हे गाण तर तुफान गाजलेलं आहे. आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याच्याकडून आदरांजली

कोलकाता येथे कार्यक्रम करत असताना केके यांचे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले. आयुष्य किती नाजूक आहे याची आणखी एक आठवण. त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत माझ्या संवेदना. ओम शांती. असे ट्विटकर विरेंद्र सेहवाग याने त्यांना आदरांजली वाहिली आहे.

विरेंद्र सेहवाग याचं ट्विट

निधन कसे झाले?

संध्याकाळी एका कार्यक्रमानंतर केके यांना त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर अस्वस्थ वाटत होते,  त्यांनी जवळजवळ एक तास गाणी गायली होते. त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, त्यांनी सांगितले.

केके यांची कारकिर्द

दिल्ली येथे हिंदू मल्याळी परिवारात सी. एस. मेनन आणि कुननाथ कनकवल्ली यांच्या पोटी जन्मलेले कृष्णकुमार कुननाथ यांचे पालनपोषण नवी दिल्लीत झाले. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी केकेंनी 3,500 जिंगल्स गायल्या. ते दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूलचे विद्यार्थी होते. किरोरी माल कॉलेजमध्येही त्यांचे शिक्षण झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. 1999 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांनी “जोश ऑफ इंडिया” गायले. जे खूप गाजले होते.

असा आहे केके यांचा परिवार

केकेने 1991 मध्ये त्यांच्या बालपणीची मैत्रण ज्योती यांच्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा नकुल कृष्ण कुननाथ याने त्यांच्यासोबत त्याच्या हमसफर अल्बममधील “मस्ती” हे गाणे गायले आहे. केके यांना तमारा कुननाथ नावाची मुलगी देखील आहे. 31 मे 2022 च्या रात्री कॉलेज फेस्टमध्ये परफॉर्म केल्यानंतर कोलकाता येथील द ग्रँड हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

केके यांचा करिअर ग्राफ

1999 मध्ये सोनी म्युझिक नुकतेच भारतात लॉन्च झाले होते आणि ते नवीन कलाकार लाँच करण्याच्या विचारात होते. तेव्हा KK यांची निवड झाली आणि ते लेस्ले लुईसने संगीतबद्ध केलेला पाल नावाचा एकल अल्बम घेऊन आले. यातील गीते मेहबूब यांनी लिहिली आहेत. “आप की दुआ”, “यारों” आणि “पल” या गाण्यांनी अल्पावधीतच तरुणांच्या ओठांवर राज्य केले. या अल्बमने नुकताच इतिहास रचला. पाल हा सोनी म्युझिक अंतर्गत KK ने रिलीज केलेला पहिला अल्बम होता ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गायक म्हणून स्क्रीन अवॉर्ड मिळाला होता.

आठ वर्षांनंतर दुसरा अल्बम

22 जानेवारी 2008 रोजी आठ वर्षांच्या अंतरानंतर त्यांचा दुसरा अल्बम हमसफर रिलीज केला. या अल्बममधील “आसमान के”, “देखो ना”, “ये कहां मिल गये हम” आणि “बरसात भाई करी” ही गाणी प्रसिद्ध आहेत. याशिवाय केकेने इंग्लिश रॉक बॅलड “सिनेररिया” देखील गायले होते. “हमसफर” हा इंग्रजी आणि हिंदीचे मिश्रण आहे. हमसफर अल्बममध्ये 10 गाणी आहेत, त्यापैकी आठ गाण्यांना केके यांनी संगीत दिले आहे. इतर दोन गाणी त्याच्या आधीच्या पाल अल्बममधून घेतली होती.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.