Singer KK Death Video : मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधीचा KK यांचा व्हिडीओ समोर, ते गात होते, ‘हम रहे या ना रहें कल..’

31 मे रोजी केकेचं निधन झालं. वयाच्या 53 वर्षी हार्टअटॅकमुळे गायक केके यांच्या मृत्यूनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.

Singer KK Death Video : मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधीचा KK यांचा व्हिडीओ समोर, ते गात होते, 'हम रहे या ना रहें कल..'
गायक केके यांचा मृत्यूImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:34 AM

मुंबई : प्रसिद्ध गायक केके (Singer KK Death) यांच्या अकाली मृत्यूनं अवघी संगीतसृष्टी (Music Industry) हादरुन गेली आहे. कोलकातामधील एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान, केके गात होते. याच कार्यक्रमात केके याला हृदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर केके यांना तातडीनं रुग्णालयामध्येही आणण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 31 मे रोजी ज्या ऑडिटोरीअमध्ये केके कॉन्सर्टमध्ये गात होते, त्या कॉर्न्सर्टमधील वेगवेगळे व्हिडीओ आता समोर आले आहेत. ‘हम रहे या ना रहे कल’ हे गाणं गाताना केके व्हिडीओमध्ये दिसून आलेत. मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधीही या व्हिडीओनं चाहते सुन्न झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

Najrul Manch या फेसबकुवर पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कॉन्सर्टचा उत्साही माहौल दिसून आला आहे.

केके यांच्या मृत्यूनं मोदींनाही धक्का

मोठ्या संख्येने चाहते ऑडिटोरीअमध्ये उपस्थित होते. प्रत्येकजण आपल्या मोबाईल फोनमध्ये केकेच्या परफॉरमन्सचा लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. संगीतमय वातावरणात तल्लीन झालेल्या चाहत्यांनी अचानक काय झालं, याची काही कल्पना येऊ शकली नाही.

छोटी सी है जिंन्दगी…

45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हम रहे या ना रहें कल, हे गाणं गाताना दिसतो. छोटी सी है जिन्दगी, असे बोलत गाताना केकेच्या या व्हिडीओची सुरुवात होते. त्यानंतर कॅमेरा प्रेक्षकांच्या दिशेने फिरतो. मोठ्या संख्येनं चाहते गाण्यात मग्न झालेले असतात. केकेसोबतच्या सुरांत सूर मिसळून कॉन्सर्ट ऐकायला आलेल्या चाहत्यांचाही सूर व्हिडीओमध्ये ऐकयाला मिळतोय.

31 मे रोजी केकेचं निधन झालं. वयाच्या 53 वर्षी हार्टअटॅकमुळे गायक केके यांच्या मृत्यूनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. पल, यारो, तडप तडप के इस दिल से, ही त्यांची गाजलेली गाणी.

केके यांनी एक तास कॉन्सर्टमध्ये गाणी गायली होती. त्रास होऊ लागल्यानं त्यांना कोलकातामधीलच एका खासगी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पण तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.