Singer KK Passes Away live updates : केके यांचं पार्थिव मुंबईत दाखल, उद्या देणार शेवटचा निरोप

| Updated on: Jun 01, 2022 | 10:03 PM

सुप्रसिद्ध गायक केके यांचं मंगळवारी निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

Singer KK Passes Away live updates : केके यांचं पार्थिव मुंबईत दाखल, उद्या देणार शेवटचा निरोप
केके यांचं पार्थिव मुंबईत दाखल

सुप्रसिद्ध गायक केके यांचं मंगळवारी निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. कोलकातामधील गुरुदास कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये केके सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली. कृष्णकुमार कुन्नाथ असे त्यांचे पूर्ण नाव होतं. 23 ​​ऑगस्ट 1968 रोजी त्यांचा जन्म झाला होता. ते केके म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. त्यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. ते त्यांच्या पिढीतील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जात होते.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jun 2022 09:34 PM (IST)

    उद्या केके यांच्यावर अंत्यसंस्कार

    बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यावर मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • 01 Jun 2022 09:21 PM (IST)

    केके यांचं पार्थिव मुंबईत

  • 01 Jun 2022 09:14 PM (IST)

    केके यांचं पार्थिव मुंबईत दाखल

  • 01 Jun 2022 09:13 PM (IST)

    KK Death : केकेंच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत, कॉन्सर्ट आयोजकांवरही अनेक आरोप

  • 01 Jun 2022 07:09 PM (IST)

    राज्य राखीव दलाच्या जवानाने केली दुसऱ्या जवानाची हत्या..नंतर जवानाने स्वतः आत्महत्या केली

    राज्य राखीव दलाच्या जवानाने केली दुसऱ्या जवानाची हत्या..नंतर जवानाने स्वतः आत्महत्या केली

    गोळया घालुन ठार मारणाऱ्या जवानाचे नाव श्रीकांत बेरड तर मृतकाचे नाव बंडु नवतर

  • 01 Jun 2022 05:36 PM (IST)

    गायक के.के. यांना बंदुकीची सलामी

  • 01 Jun 2022 04:55 PM (IST)

    अभिनेता चिरंजीवी यांच्याकडून केके यांना श्रद्धांजली

  • 01 Jun 2022 04:54 PM (IST)

    दिपाली सय्यद यांची उमा खापरेंविरोधात तक्रार

    दिपाली सय्यद यांची उमा खापरे यांच्या तक्रार

    ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे

    काय खरं काय खोटं ते कळतंय लोकांना

    आजपर्यंत अमृता फडणवीसांनी काय केलं?

  • 01 Jun 2022 04:39 PM (IST)

    दिपाली सय्यद ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल

    दिपाली सय्यद ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल

    किरीट सोमय्यांविरोधात तक्रार दाखल करणार, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द

  • 01 Jun 2022 04:29 PM (IST)

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यााकडून केके यांना आदरांजली

  • 01 Jun 2022 03:40 PM (IST)

    ती 5 कारणे जी सिंगर KK च्या मृत्यूला कारणीभूत ठरली

    गायक केके यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व हादरलंय. कोलकातामधील लाईव्ह शोदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. कार्डिॲक अरेस्टने केके यांचं निधन झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्याचसोबत या कार्यक्रमातील काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाचा संपूर्ण बातमी

  • 01 Jun 2022 02:09 PM (IST)

    गुरुवारी मुंबईत पार पडणार अंत्यसंस्कार

    गुरुवारी मुंबईत पार पडणार केके यांच्यावर अंत्यसंस्कार

    आज पार्थिव मुंबईत आणलं जाणार

    53 व्या वर्षीत केके यांनी घेतला अखेरचा श्वास

    शासकीय इतमामात दिली जाणार मानवंदना

    आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात मुंबईत पार्थिव दाखल होण्याची शक्यता

    उद्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार

  • 01 Jun 2022 01:31 PM (IST)

    Video : ‘हाsssय, मर जाऊ यहीं पे’ असं म्हणणाऱ्या केकेचा मृत्यू मॉब लिचिंगसारखाच!

    फेसबुक पोस्टमध्ये केकेच्या मृत्यूआधीचे पाच व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. पाच पैकी एका व्हिडीओमध्ये केके ‘हाय मर जाऊ यहीं पे’ असं म्हणताना दिसलाय. एका ऑडिटोरीअममध्ये सुरु असलेल्या केकेच्या कॉन्सर्टबाबत नेमकं फेसबुक पोस्टमध्ये काय लिहीलंय आणि ते पाच व्हिडीओ काय आहेत, हे जाणून घेऊयात… वाचा सविस्तर रिपोर्ट – इथे क्लिक करा

  • 01 Jun 2022 01:18 PM (IST)

    शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण

    केके यांच्या पार्थिवावरील शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. थोड्या वेळात ग्रीन कॉरिडॉर बनवून केके यांच्या पार्थिवाला कोलकाता एअरपोर्टवर नेलं जाईल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसुद्धा तेथे उपस्थित राहतील. कोलकाता एअरपोर्टवर कोलकाता पोलिसांकडून अखेरची मानवंदना दिली जाईल.

  • 01 Jun 2022 12:39 PM (IST)

    कार्यक्रमाच्या हॉलमधील व्यवस्थापनावर भाजपने उपस्थित केले प्रश्न

    केके यांचा लाईव्ह शो ज्याठिकाणी पार पडला, त्या हॉलमध्ये एसी, ऑक्सिजन लेव्हल आणि क्षमता या गोष्टींची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.

  • 01 Jun 2022 11:50 AM (IST)

    KK यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटपटू हळहळले

    अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, वीवी एस लक्ष्मण आणि सुनील जोशी असे दिग्गज क्रिकेपटू केकेच्या गाण्यांचे चाहते होते. केकेच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांनी टि्वट करुन श्रद्धांजली वाहिली. वाचा संपूर्ण बातमी

  • 01 Jun 2022 11:19 AM (IST)

    ज्या हॉटेलमध्ये केके थांबले होते, तिथे चौकशीसाठी पोलिस सहआयुक्त पोहोचले

    कोलकाताचे पोलिस सहआयुक्त (गुन्हे) मुरलीधर शर्मा ओबेरॉय ग्रँड येथे पोहोचले. या हॉटेलमध्ये केके राहत होते.

  • 01 Jun 2022 11:16 AM (IST)

    ममता बॅनर्जी यांनी केके यांच्या पत्नीशी केली बातचित; मदतीचं दिलं आश्वासन

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केके यांच्या पत्नीशी संवाद साधला. केके यांच्या पत्नीला त्यांनी जमेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. यादरम्यान मंत्री अरुप विश्वास हे सीएमआरआई रुग्णालयात पोहोचले आहेत.

  • 01 Jun 2022 10:31 AM (IST)

    गायिका श्रेया घोषालने व्यक्त केला शोक

    ‘केकेच्या निधनाची बातमी मला अजूनही पचनी पडत नाहीये. केके का असं केलंस? या गोष्टीचा स्वीकार करणंच खूप कठीण आहे’, अशा शब्दांत गायिका श्रेया घोषालने दु:ख व्यक्त केलं.

  • 01 Jun 2022 10:24 AM (IST)

    हॉस्टिपलमध्ये नेण्याआधी स्टेजवर केकेसोबत काय घडलं?

    सुप्रसिद्ध गायक केकेच्या मृत्यूनंतर (Singer KK Death Last video) आता कॉन्सर्टमधील वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. नुकत्यात हाती आलेल्या व्हिडीओमध्ये केकेचा शेवटच्या परफॉरमन्स नंतर स्टेजवर नेमकं काय घडलं, हे समोर आलंय. वाचा संपूर्ण बातमी

  • 01 Jun 2022 09:17 AM (IST)

    इन्स्टाग्रामवरील केकेची अखेरची पोस्ट

    जवळपास 20 तासांपूर्वी केकेने इन्स्टाग्रामवर त्याच्या कॉन्सर्टविषयीची पोस्ट लिहिली होती. विवेकानंद कॉलेजमधील परफॉर्मन्सचे काही फोटोसुद्धा त्यांनी पोस्ट केले.

    View this post on Instagram

    A post shared by KK (@kk_live_now)

  • 01 Jun 2022 09:13 AM (IST)

    कार्डिॲक अरेस्टने केके यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा संशय

    केके यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी डॉक्टर आज पोस्टमॉर्टम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कार्डिॲक अरेस्टनेच मृत्यू झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

  • 01 Jun 2022 08:34 AM (IST)

    गायक केकेचा मृत्यू हृदयविकाराने की घातपात? पोलीस तपास सुरु

    सुप्रसिद्ध गायक केकेचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, केकेचा मृत्यू नैसर्गिक की घातपात? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आलाय. केकेच्या डोक्यावर मार लागल्याचंही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याबाबत पुढील तपास सुरु करण्यात आलाय. लाईव्ह कॉन्सर्टच्या आयोजकांची चौकशी पोलीस करणार आहेत.

  • 01 Jun 2022 08:23 AM (IST)

    गायक केकेच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल, केकेच्या चेहऱ्याला आणि डोक्याला मार लागल्याची माहिती

    गायक केकेच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल, केकेच्या चेहऱ्याला आणि डोक्याला मार लागल्याची माहिती

Published On - Jun 01,2022 8:18 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.