धक्कादायक… 20 वर्षांपासून प्रसिद्ध गायिका करतेय अनेक आजारांचा समाना, म्हणाली, ‘मला खूप काही बोलायचंय पण…’
'मला खूप काही बोलायचंय पण...', 20 वर्षांपासून गंभीर आजाराचा सामना करते प्रसिद्ध गायिका.... वयाच्या 20 व्या वर्षापासून आजारी... सतत येणारा थकवा..., डिप्रेशन..., ट्रॉमा..., गायिकेकडून धक्कादायक सत्य समोर...

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे आजारांचा सामना करत आहेत. अशीच एक बॉलिवूडमधील गायिका गेल्या दोन दशकांपासून गंभीर आजाराचा सामना करत आहे. सध्या ज्या गायिकेची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून गायिका नेहा भसीन आहे. वयाच्या 20 व्या वर्षापासून नेहा अनेक समस्यांचा सामना करत आहे. नुकताच, नेहा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून सामना करत असलेल्या आजारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नेहाने सांगितलं आहे की, तिला FIBROMYALGIA नावाच्या आजाराने ग्रासलं आहे.
नेहा भसीन पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मला खूप काही बोलायचं आहे. पण माहिती नाही कसं माझ्या आयुष्यातील घटना तुम्हाला सांगू… गेल्या अनेक वर्षांपासून माहिती आहे… काही तरी अडचण आहे… अखेर मेडिकल टर्मने माझ्या अडचणीला FIBROMYALGIA असं नाव दिलं… मला वयाच्या 20 व्या वर्षापासून त्रास होतोय, पण मेडिकल पेपर्सवर 2 वर्ष लिहिलं आहे. सर्वकाही जाणून माझं मानसिक संतूलन बिघडत आहे…’
View this post on Instagram
‘प्रत्येक महिन्याला थकवा… बॉडी पेन… मानसिक त्रास… एंग्जायटी… डिप्रेशन… ट्रॉमा…, काही खाण्याची इच्छा नाही, नीट झोप लागत नाही… तरी देखील थेरपीसाठी जा… एकटं राहायचं नाही…. जास्त काम करायचं नाही, कारण अधिक तणाव आरोग्यास घातक आहे… असं सांगण्यात आलं आहे…’
‘तुम्ही जे नाव घ्याल, तो आजार मला आहे… हा माझा पराजय आहे का? पण आता मी सर्व गोष्टींचा, सर्व अडचणींचा स्वीकार केला आहे. अनेक त्रास असताना देखील मी वर्कआऊट, डान्स आणि परफॉर्म केलं. मी स्वतःला बांधत आहे असा विचार केला. माझे थेरेपिस्ट मला काहीही न करण्यासाठी सांगतात… सत्य स्वीकारल्यामुळे मनावरील ताण कमी होतो. पण मन किती खचलं आहे जाची देखील जाणीव होत असते…’
नेहा पुढे म्हणाली, ‘मानसिकरित्या मी पूर्णपणे खचली आहे. मी हा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून सहन करत आहे…’ असं देखील नेहा भसीन सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाली.