Bigg Boss फेम ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात अडकणार नेहा कक्करचा भाऊ Tony? फोटो व्हायरल
झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत असताना नेहा कक्कर हिचा भाऊ टोनी चढणार बोहल्यावर; Bigg Boss फेम 'या' अभिनेत्रीसोबत करणार नव्या आयुष्याला सुरुवात ? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
मुंबई : प्रसिद्ध गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचा भाऊ टोनी कक्कर (Tony Kakkar) देखील एक उत्तम गायक म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत टोनी कक्कर याने देखील अनेक गाणी गायली आहेत. अनेक धमाकेदार गाणी स्वतःच्या नावावर करणार टोनी सोशल मीडियावर देखील कायय सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. टोनी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील कायम चर्चेत असतो. टोनी याने आता तर चक्क लग्नाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
टोनी कक्कर सध्या स्वतःच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. टोनी याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये गायक बिग बॉस 13 (Bigg Boss 13) फेम एका अभिनेत्रीला प्रपोज करताना दिसत आहे. एवढंच नाही तर टोनीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर बहीण नेहा कक्कर हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.
टोनीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तो एका प्रसिद्ध अभिनेत्री प्रपोज करताना दिसत आहे. फोटोमध्ये टोनीच्या चेहऱ्यावर आनंद फुलून दिसत आहे. टोनीने इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला टॅग देखील केलं आहे. टोनीने अभिनेत्रीला प्रपोज तर केलं पण तिच्याकडून अद्याप होकार आलेला नाही. टोनीसोबत दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री जास्मिन भसीन आहे. सध्या टोनीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री जास्मिन भसीन हिच्यासोबत फोटो पोस्ट करत टोनी याने कॅप्शनमध्ये ‘शादी करोगी…?’ असं लिहिलं आहे. यावर उत्तर देत जास्मिन भसीन म्हणते आई विचारेल…’ टोनीची पोस्ट आणि जास्मिन भसीन हिच्या उत्तरानंतर तुम्ही देखील गोंधळात पडला असाल. पण दोघे लग्न करत नसून, दोघांच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी टोनी याने पोस्ट केली आहे.
टोनी याने त्याच्या म्यूझिक व्हिडीओची पहिली झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. दोघांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सध्या सर्वत्र टोनी आणि जास्मिन यांच्या फोटोची चर्चा तुफान रंगत आहे. आता टोनी आणि जास्मिन यांच्या गाण्याच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.
जास्मिन भसीन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आली. जास्मिन हिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता सध्या जास्मिन टोनीसोबत असलेल्या फोटोमुळे चर्चेत आहे.