Aditya Narayan Wedding | ‘पुढे काही झाले तर मला दोष देऊ नको’, लग्न करणाऱ्या मुलाला उदित नारायणांची तंबी!

या विवाहावर खुद्द आदित्य नारायणचे वडील, गायक उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aditya Narayan Wedding | ‘पुढे काही झाले तर मला दोष देऊ नको’, लग्न करणाऱ्या मुलाला उदित नारायणांची तंबी!
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 3:06 PM

मुंबई : गायक-अभिनेता आदित्य नारायण लवकरच विवाहबद्ध होणार आहे. अभिनेत्री श्वेता अग्रवालशी तो लग्न करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीस हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या विवाहावर खुद्द आदित्य नारायणचे वडील, गायक उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्यच्या लग्नाने खुश असले तर, ‘पुढे काही झाले तर मला दोष द्यायचा नाही’, असे म्हणत त्यांनी लेकाला तंबी दिली आहे. (Singer Udit Narayan Reacted on Aditya narayan’s Wedding)

‘मी श्वेताला बर्‍याच वर्षांपासून ओळखत आहे. पण फक्त आदित्यची मैत्रीण म्हणूनच! मला माहित नव्हते की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. एक दिवस आदित्य माझ्याकडे आला आणि म्हणाला की, त्याला श्वेताशी लग्न करायचे आहे. मी फक्त त्याला इतकेच सांगितले आहे की, तुझा निर्णय तू घेतला आहेस, तेव्हा भविष्यात काही घडल्यास पालकांना दोष देऊ नकोस’, असे उदित नारायण एका मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत.

तसेच, ‘सगळी परीस्थिती आटोक्यात आली तर, 1 डिसेंबरला जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार आदित्यचा विवाह सोहळा पार पडेल. मला माझ्या मुलाचे लग्न थाटामाटात करायचे होते.परंतु, कोरोना संक्रमण पाहता ते शक्य होणार नाहीय’, असे उदित नारायण यांनी म्हटले. (Singer Udit Narayan Reacted on Aditya narayan’s Wedding)

अभिनेत्रीशी थाटणार संसार

आदित्य नारायण त्याची सह-अभिनेत्री श्वेता अग्रवालशी (Shweta Agarwal) विवाह बंधनात अडकणार आहे. श्वेताने आदित्यसोबत ‘शापित’ या चित्रपटात काम केले होते. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सेटवरच आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता 10 वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. या वर्षाच्या अखेरीस, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने आपण तिच्यावर प्रेम करू लागलो आहोत, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.’ (Singer Udit Narayan Reacted on Aditya narayan’s Wedding)

View this post on Instagram

?

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial) on

आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले

तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेण्याविषयी बोलताना आदित्य (Aditya Narayan) म्हणाला, ‘प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्या न्यात्यानेही गेल्या 10 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सगळ्यात आम्ही एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. लग्न ही केवळ फॉर्मेलिटी आहे. या वर्षाअखेरीस आम्ही लग्न करणार आहोत. आई-वडिलांनाही श्वेताबद्द्ल माहिती आहे. त्या दोघांनाही ती खूप आवडते. इतक्या छान जोडीदारामुळे मी देखील खूप खुश आहे.’

एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला

‘प्रत्येक नात्यात काहीना काही अडचणी असतात. याचा अर्थ असा नाही की, ते नाते नाते संपवले पाहिजे. आजकाल अशी लग्न फार कमी कालावधीत तुटतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेतला. 10 वर्ष एकमेकांसोबत घालवल्यावर, आता या नात्याला पुढे नेण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे म्हणत आदित्यने त्याच्या नातेसंबधातील भावनिक बंध उलगडला.

(Singer Udit Narayan Reacted on Aditya narayan’s Wedding)

संबंधित बातम्या : 

नेहा कक्कर बोहोल्यावर चढणार, या गायकासोबत बांधणार सात जन्माची गाठ

Aditya Narayan | गायक आदित्य नारायण आर्थिक अडचणीत, पैशांसाठी ‘बाईक’ विकण्याची वेळ!

गायक आदित्य नारायण बोहल्यावर चढणार, ‘या’ अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधणार!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.