‘त्याने फक्त एकदा मला फोन केला असता तर…’, सुशांतच्या आठवणीत स्मृती इराणी यांच्या डोळ्यात आलं पाणी

'मला संशय होता सुशांत असं काहीतरी करेल, त्याने एकदा फोन केला असता तर...', सुशांतच्या निधनाच्या अनेक वर्षांनंतर स्मृती इराणी यांच्याकडून मोठा खुलासा

'त्याने फक्त एकदा मला फोन केला असता तर...', सुशांतच्या आठवणीत स्मृती इराणी यांच्या डोळ्यात आलं पाणी
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 4:51 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला जवळपास दोन पेक्षा अधिक वर्षांचा काळ उलटला आहे. पण तरी देखील अभिनेत्याच्या आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. दरम्यान, भाजप नेत्या स्मृती इराणी देखील सुशांतच्या आठवणीत भावुक झाल्या आहेत. एका मुलाखतीत सुशांतची आठवण सांगत असताना स्मृती इराणी यांच्या डोळ्यातून पाणी आलं. सुशांतच्या निधनानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या निधनापूर्वी स्मृती इराणी यांचं अभिनेत्यासोबत फोनवर बोलणं झालं होतं. त्यानंतर सुशांतच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर स्मृती इराणी यांना मोठा धक्का बसला. सुशांतने टोकाचा निर्णय घेण्याआधी माझ्यासोबत फोनवर संवाद साधायला हवा होता… असं स्मृती इराणी मुलाखतीत म्हणाल्या.

एका मुलाखतीत स्मृती इराणी १४ जून २०२० हा दिवस आठवत भावुक झाल्या. याच दिवशी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. स्मृती इराणी म्हणाल्या, ‘ज्या दिवशी सुशांतचं निधन झालं, तेव्हा मी कॉन्फ्रेंसमध्ये होती. तेथे खूप लोक होती, पण मी कॉन्फ्रेंस थांबली. तेव्हा मला असं वाटलं त्याने मला फोन का नाही केला? त्याने मला एक फोन करायला हवा होता…’

हे सुद्धा वाचा

‘मी त्याला सांगितलं होतं, स्वतःला काही करून घेवू नको… मी सुशांतचा मित्र अमित साद याला फोन केला आणि सांगितलं मला भीती आहे की, सुशांत काही करेल… ‘ असं देखील स्मृती इराणी म्हणाल्या.. सुशांत आणि स्मृती इराणी यांची चांगली ओळख होती. अभिनेत्याच्या निधनानंतर स्मृती इराणी यांनी ट्विट करत भावना व्यक्त केल्या.

बॉलिवूडचा उभरता अभिनेता असताना सुशांतने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे चाहत्यांसह सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला. सुशांत आणि स्मृती इराणी यांनी एकत्र ‘काई पो चे’ सिनेमा काम केलं. सुशांतच्या निधनानंतर आजही अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

sushant singh rajput

स्मृती इराणी यांनी आता राजकारणाचा मार्ग धरला असला तरी, त्यांची ओळख टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून देखील आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत त्यांनी तुलसी ही भूमिका साकारली होती.

आजही त्यांची भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहे. स्मृती इराणी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर स्मृती इराणी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.