स्मृती इराणी यांच्या मॉडेलिंगच्या दिवसातील ‘तो’ फोटो पाहताच नेटकरी थक्क!

सोशल मीडियावर अनेक ट्रेंड्स सुरू असतात. सध्या वयाच्या 21 व्या वर्षी आपण कसे दिसायचो, हे दाखवणारा फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनीसुद्धा या ट्रेंडमध्ये भाग घेत आपला जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

स्मृती इराणी यांच्या मॉडेलिंगच्या दिवसातील 'तो' फोटो पाहताच नेटकरी थक्क!
Smriti Irani Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 10:26 AM

मुंबई : 6 फेब्रुवारी 2024 | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. स्मृती इराणी यांच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील हा फोटो आहे. सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड आला आहे. या ट्रेंडअंतर्गत वयाच्या 21 व्या वर्षाचा थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर अनेकजण शेअर करत आहेत. याच ट्रेंडमध्ये स्मृती इराणीसुद्धा सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे या फोटोत स्मृती इराणी यांना ओळखणंच कठीण झालं आहे. त्यावर अभिनेत्री मौनी रॉय, निर्माती एकता कपूर, मंदिरा बेदी, मनिष पॉल यांसह अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

वयाच्या 21 व्या वर्षातील या फोटोमध्ये स्मृती इराणी फ्लोरल आऊटफिटमध्ये दिसून येत आहेत. या फोटोसोबतच त्यांनी ‘खो गए हम कहाँ’ हे गाणं समाविष्ट केलं आहे. हा फोटो पोस्ट करताच अवघ्या काही तासांत त्यावर हजारो लाइक्स आणि कमेंट्स येऊ लागल्या आहेत. निर्माती एकता कपूरने लिहिलं, ‘या मुलीला मी ओळखते. तिला पाहताचक्षणी मी ठरवलं होतं की ती माझी स्टार आहे.’ अभिनेत्री मंदिरा बेदीनेही कमेंट करत लिहिलं, ‘वॉव, हा खूप गोड फोटो आहे.’ अभिनेता मनीष पॉल म्हणाला, ‘अरे वाह!’ काहींनी या फोटोवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तो निरागसपणा हरवला आहे’, असं एका युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

स्मृती इराणी यांनी मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. मनोरंजन विश्वातील त्यांचा प्रवास अनेक चढउतारांचा होता. स्मृती इराणी या कमी वयात मुंबईत करिअर करण्यासाठी आल्या होत्या. बऱ्याच संघर्षानंतर त्यांनी मॉडेलिंग विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यांनी ‘मिस इंडिया 1998’ या सौंदर्यस्पर्धेतही भाग घेतला होता. या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत त्यांनी बाजी मारली होती. यानंतर त्यांनी काही मॉडेलिंग कँपेन्ससुद्धा केल्या होत्या. बऱ्याच ऑडिशन्सनंतर स्मृती इराणी यांना निर्माती एकता कपूरने ‘क्यूंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी निवडलं. या मालिकेतील त्यांची तुलसीची भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.