Yami Gautam | ‘काही जण एका रात्रीत…’, अंडर युटिलाइज्ड म्हणाल्यानंतर यामी गौतम हिची प्रतिक्रिया

'इंडस्ट्रीमधील बहुतेक लोकांसाठी सर्वकाही...', अंडर युटिलाइज्ड म्हणाल्यानंतर अभिनेत्री यामी गौतम झाली व्यक्त... सध्या सर्वत्र यामी गौतम हिची चर्चा...

Yami Gautam | 'काही जण एका रात्रीत...', अंडर युटिलाइज्ड म्हणाल्यानंतर यामी गौतम हिची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 11:04 AM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : ‘विकी डोनर’, ‘दसवी’, ‘बदलापूर’, ‘भूत पोलीस’, ‘काबील’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता देखील अभिनेत्री ‘ओएमजी २’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी करताना दिसत आहे. सिनेमातील डायलॉग्स, कोर्टरुम ड्रामा आणि कॉमेडी सीक्वेंस प्रेक्षकांना आवडत आहे. दरम्यान, यामी ‘ओएमजी २’ सिनेमामुळे चर्चेत आली आहेत. अशात सोशल मीडियावर एका युजरने अभिनेत्रीला अंडर युटिलाइज्ड म्हटलं आहे. यावर अभिनेत्री स्वतःचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

एका युजर अभिनेत्री म्हणाला अंडर युटिलाइज्ड

ट्विटरवर युजर म्हणाला, ‘यामी प्रत्येक वेळेस आपल्या अभिनयाने चाहत्यांना हैराण करते ही थक्क करणारी गोष्ट आहे. ‘ओएमजी २’ यासाठी अपवाद नाही. यामी स्वतःच्या फ्रेमची मालकीण आहे. तिचा शांत स्वभाव देखील खूप काही सांगून जातो. मला ‘अंडरेटेड’ शब्दाचा तिरस्कार आहे. मी एवढेच म्हणेन की आपला सिनेमा निर्मात्यांनी तिच्याकडे लक्ष दिलेलं नाही..’

हे सुद्धा वाचा

युजरच्या ट्वीटवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

‘इंडस्ट्रीमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी एक रात्रीत यश मिळालं, तर काही लोकांना मात्र अनेक वर्ष स्वतःला सिद्ध करावं लागतं. काही लोकं स्वतःच्या कौशल्याचा मार्केटिंग अगदी व्यवस्थित करतात. काही लोकांना फक्त त्यांच्या कौशल्यावर बोलायला आवडतं. एक अभिनेत्री म्हणून मी फक्त अभिनयावर लक्ष केंद्रीत करते..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी उत्तम स्क्रिप्ट आणि भूमिकांची ओळख करण्यावर मेहनत घेते आणि हेच माझं कौशल्य आहे. मला माझ्या कौशल्याच्या मार्केटिंगमध्ये फारसं काही कळत नाही किंवा मी त्यात गुंतत नाही. दुर्दैवाने, आपल्या इंडस्ट्रीतील बहुतेक लोकांसाठी, सर्व काही एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्रोजेक्टच्या मार्केटिंगवर अवलंबून असतं, कदाचित याच कारणामुळे माझ्यावर लोकांचं लक्ष नसतं..

प्रतिक्रिया दिल्यानंतर अभिनेत्रीने युजरचे आभार देखील मानले आहेत. ‘तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानते.. मी खरंच उत्साही झाली आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.