‘सिगारेटने चटके द्यायचा, शोषण करायचा…’, जेव्हा अभिनेत्रीने सलमान खानवर केले होते गंभीर आरोप

अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचं नाव जोडण्यात आलं, पण 'या' अभिनेत्री सलमानवर केले होते गंभीर आरोप

'सिगारेटने चटके द्यायचा, शोषण करायचा...', जेव्हा अभिनेत्रीने सलमान खानवर केले होते गंभीर आरोप
'सिगारेटने चटके द्यायचा, शोषण करायचा...', जेव्हा अभिनेत्रीने सलमान खानवर केले होते गंभीर आरोप Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 5:23 PM

Happy Birthday Salman Khan: बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थातच अभिनेता सलमान खान आज 57 वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाला हजेरी लावली. आज अभिनेत्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. अभिनेता त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. अभिनेत्याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं, पण अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी आलीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामध्ये सोमीने सलमानवर मारहाण आणि सिगारेटने चटके दिल्याचे आरोप केले. सोमी अली अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचं नाव सलमानसोबत जोडण्यात आलं आणि अनेक वर्ष चर्चेत राहिलं.

सोमी अलीने एक सोशल मीडिया पोस्ट करत सलमानचं नाव न घेता अभिनेत्यावर गंभीर आरोप केले. पोस्टमध्ये सोमी म्हणाली, ‘माझा शो भारतात बंद केला. एवढंच नाही तर वकिलांच्या माध्यमातून मला धमकावलं. मला मारहाण केली. सिगारेटने चटके दिले.. अनेक वर्ष माझं शोषण केलं…’

पुढे सोमी अली म्हणाली, ‘जे लोक तुला पाठिंबा देतात, त्यांना लाज वाटली पाहिजे, जे एका महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला साथ देतात.’ सोमी अलीने पोस्ट केल्यानंतर तात्काळ डिलीट केली. पण अनेकदा सोमीने सलमान विरोधात आवाज उठवला आहे.

सोमी आणि सलमान अनेक वर्ष करत होते एकमेकांना डेट 90 च्या दशकात सोमी आणि सलमान यांच्या रिलेशनशीपबद्दल अनेक चर्चा रंगल्या. जवळपास 8 वर्ष सोमी-सलमान एकत्र होते. दोघांनी एकत्र एका जाहिरातीचं शुटिंग देखील केलं. पण अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

अखेर दोघांचे मार्ग वेगळे झाले. सलमान आणि अभिनेत्री संगीता बिजलानीचं लग्न देखील सोमीमुळे तुटल्याचं अनेकदा समोर आलं. लग्नाआधी सलमान आणि सोमी यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं सलमानच्या लक्षात आलं. पण आज संगीता आणि सलमान चांगले मित्र आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.