Sonakshi Sinha चे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत प्रेमसंबंध! एकासोबत थाटणार होती संसार पण…
'या' प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचं नाव... एकासोबत लग्न देखील होणार होतं, पण... सध्या सर्वत्र 'दबंग गर्ल'च्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा
मुंबई | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. फार कमी कालावधीत सोनाक्षी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सोनाक्षी अव्वल स्ठानी आहे. ‘दबंग’ सिनेमानंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण याचदरम्यान अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत सोनाक्षीचं नाव देखील जोडण्यात आलं. पण ज्या अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं, त्यांच्यासोबत सोनाक्षीचं नात जास्त काळ टिकू शकलं नाही. आज सोनाक्षीचा वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवू अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल…
अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) | अर्जुन आणि सोनक्षी यांनी ‘तेवर’ सिनेमात एकत्र काम केलं. सिनेमाची शुटिंग समोर असताना, त्यांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही.
अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) | शाहिद याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. सोनाक्षी आणि शाहिद ‘आर राजकुमार’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमानंतर दोघांच्या नावाची प्रचंड चर्चा रंगली. पण आता शाहिद पत्नी मीरा राजपूत हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.
बंटी सजदेह (Bunty Sajdeh) | बंटी सजदेह याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. दोघांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट देखील केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण काही वर्षांनंतर बंटी आणि अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं..
आदित्य श्रॉफ (Aditya Shroff) | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फेम सिनेमाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य श्रॉफलाही डेट केले आहे. मात्र, लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले. आदित्य याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही..
झहीर इकबाल (Zaheer Iqbal) | सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी तुफान जोर धरला होता. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. मात्र, आतापर्यंत झहीर किंवा सोनाक्षी दोघांनीही त्यांच्या डेटिंगच्या अफवांवर स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.