सोनाली कुलकर्णीच्या ‘तमाशा लाईव्ह’ची उत्सुकता; अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर

| Updated on: May 27, 2022 | 3:29 PM

‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या तमाशा लाईव्हची उत्सुकता; अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर
Tamasha Live
Image Credit source: Youtube
Follow us on

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चे (Tamasha Live) जबरदस्त टिझर सोशल मीडियावर झळकले होते. टिझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता इतकी वाढवली की, प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र आता ‘तमाशा लाईव्ह’साठी प्रेक्षकांना जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण येत्या 15 जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, “टिझरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आम्ही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तमाशा लाईव्ह’म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगितिक मेजवानी आहे. आपली लोककला जपत त्याला आधुनिकतेचा साज देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.”

हे सुद्धा वाचा

सोनाली कुलकर्णीची इन्स्टा पोस्ट-

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केला असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत.