सोनाली बेंद्रे हिला देखील होती अंडरवर्ल्डची भीती, अभिनेत्रीने सांगितलेलं सत्य भयानक
Sonali Bendre : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये होती अंडरवर्ल्डची दहशत, सोनाली बेंद्रे हिने देखील केलाय भयानक प्रसंगाचा सामना... सत्य अखेर समोर आलंच, सोनाली आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...
मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोनाली हिच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. 90 च्या दशकात सोनाली हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये असलेल्या अंडरवर्ल्डची दहशतीमुळे सोनाली हिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अभिनेत्रीने एका मुलाखतीत अंडरवर्ल्डच्या दहशतीबद्दल मोठं वक्तव्य केलं होते. इंडस्ट्रीवर अंडरवर्ल्डचं सावट असल्यामुळे अभिनेत्रीला सिनेमे मिळणं बंद झालं.
अंडरवर्ल्डच्या दहशतीमुळे सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शकांवर देखील दबाव होता. कोणत्या सिनेमात कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करायचं हे देखील अंडरवर्ल्डच्या हातात होतं. सोनाली म्हणाली, ‘1990 दशकाच्या दरम्यान, अंडरवर्ल्डने मला बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंधी घातली होती…’
सोनाली हिचा पती गोल्डी बहल याने अभिनेत्रीची मदद देखील केली. अनेकांना गोल्डी यांनी समजावलं, पण कोणीच अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे सोनाली हिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हतं. ‘अनेक सूत्र सिनेमांना अर्थिक मदत करत होते. पण सिनेमांना जसा दर्जा मिळायला हवा होता, तसा दर्जा मिळत नव्हता…’
पुढे सोनाली म्हणाली, ‘अनेकदा मला सिनेमांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण काही दिवसांत माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागायची. अंडरवर्ल्डचा दबाव असल्यामुळे मी अनेक सिनेमांमध्ये काम करणं देखील टाळलं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सोनाली हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘आग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा सोनाली फक्त आणि फक्त 19 वर्षांची होती. ‘हम साथ साथ है’, ‘मुरली’, ‘दिलजले’, ‘कल हो ना हो’, ‘टक्कर’, यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम पती आणि मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. एवढंच नाही तर वयाच्या 49 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. इन्स्टाग्रामवर सोनाली वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर सोनाली हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. सोनाली कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.