Sonam Kapoor : सोनम कपूरला मुलगा झाला, नीतू कपूरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

सोनम कपूरने 2018 साली मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले. काही महिन्यांपूर्वी सोनम आणि आनंदने त्यांच्या पहिल्या मुलाची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

Sonam Kapoor : सोनम कपूरला मुलगा झाला, नीतू कपूरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
सोनम कपूर झाली आई? रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 4:41 PM

मुंबई :’कपूर खानदान’मध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोनम कपूरने (Sonam Kapoor) मुलाला जन्म दिला आहे. संपूर्ण घर मुलाच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे. अभिनेत्री नीतू कपूरने (Nitu Kapoor) सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. नीतू कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करून सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे अभिनंदन केले आहे. सोनम कपूरच्या मुलाच्या या जगात आगमन झाल्याचा आनंदही चाहते साजरा करत आहेत.

नीतू कपूरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

शनिवारी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ती अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या वतीने आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने शनिवारी, 20 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला.

हे सुद्धा वाचा

सोनम कपूरने 2018 साली मुंबईत लग्न केलं होतं

सोनम कपूरने 2018 साली मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले. काही महिन्यांपूर्वी सोनम आणि आनंदने त्यांच्या पहिल्या मुलाची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. दोघांनी त्यांचे काही सुंदर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते. त्यावेळी देखील त्यांची पोस्ट सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली होती. त्याचबरोबर दोघांना चाहत्यांनी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.