बैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे (Sonu Sood donate tractor to Farmer family).
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे (Sonu Sood donate tractor to Farmer family). आंध्र प्रदेशमधील एक शेतकरी कुटुंब बैल नसल्याने आपल्या मुलींना नांगरला जुंपून शेत नांगरत असल्याचं समोर आलं. यानंतर सोनू सूदने तात्काळ या कुटुंबाला शेती करता यावी म्हणून तातडीने ट्रॅक्टर घरपोच केला आहे. नुकताच सोशल मीडियावर संबंधित मुली नांगराला जुंपून आई-वडिलांसोबत शेतीची मशागत करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोनू सूदने ही स्थिती पाहिल्यानंतर त्याने संबंधित कुटुंबाला तात्काळ ट्रॅक्टर पाठवत असल्याचं कळवलं.
सोनू सूदच्या या मदतीनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्या या कामाचं मोठं कौतुक होत आहे. बैल नसल्याने आणि भाड्याने ट्रॅक्टर आणण्याची आर्थिक स्थिती नसलेल्या कुटुंबाला थेट ट्रॅक्टर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या मुली म्हणाल्या, “आम्ही चित्रपटांमध्ये सोनू सूद यांना नेहमीच खलनायकाच्या भूमिकेत पाहिलं. मात्र, खऱ्या आयुष्यात ते नायक आहेत. त्यांनी कोरोना साथीच्या काळात अनेक लोकांची मदत केली. त्यांची मदत आमच्यापर्यंत देखील पोहचले असा कधी विचार केला नव्हता. आम्हाला त्यांच्या पाया पडायचं आहे.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
This family doesn’t deserve a pair of ox ?.. They deserve a Tractor. So sending you one. By evening a tractor will be ploughing your fields ? Stay blessed ❣️?? @Karan_Gilhotra #sonalikatractors https://t.co/oWAbJIB1jD
— sonu sood (@SonuSood) July 26, 2020
कोरोनामुळे उपजीविकेचे साधन असलेले चहाचे दुकान बंद
शेतकरी नागेश्वर राव यांची मुलगी वेन्नाला म्हणाली, “आमचं मदनपल्लीमध्ये 20 वर्षांपासून चहाचं दुकान होतं. कोरोनामुळे हे चहाचं दुकान बंद करावं लागलं. यानंतर आम्ही सर्व महालराजपल्ली या आमच्या मूळगावी आलो. यावर्षी गावात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतात भुईमुगाचं पीक घ्यायचं होतं. मात्र, आर्थिक परिस्थिती ढासाळल्याने आम्हाला शेती करणं कठीण जात होतं. पैसे नसल्याने बैल किंवा ट्रॅक्टर आणून शेत नांगरणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही वडिलांना नांगराला जुंपून शेती करण्याचा आग्रह धरला. तसेच आपण शेती करुयात असा आग्रह धरला.”
“आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मदतीला कुणी येईल असं कधी वाटलं नव्हतं”
“आम्ही शेती करत होतो. त्यावेळी कुणीतरी आमचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हिडीओ सोनू सूद यांनी पाहिला. यानंतर सोनू सूद आमच्या मदतीसाठी पुढे आले. आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या मदतीला कुणी समोर येईल असा कधीच विचार केला नव्हता. आम्हाला सोनू सूद यांनी स्वतः फोन करुन मदत देण्याची तयारी दाखवली तेव्हा आम्हाला विश्वास बसत नव्हता,” असंही वेन्नालाने सांगितलं.
Spoke with @SonuSood ji & applauded him for his inspiring effort to send a tractor to Nageswara Rao’s family in Chittoor District. Moved by the plight of the family, I have decided to take care of the education of the two daughters and help them pursue their dreams pic.twitter.com/g2z7Ot9dl3
— N Chandrababu Naidu #StayHomeSaveLives (@ncbn) July 26, 2020
सोनू सूदने केलेल्या या मदतीची दखल आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते चंद्रबाबू नायडू यांनी देखील घेतली. तसेच ट्विट करत याची माहिती देऊन सोनू सूदचं कौतुक केलं.
— sonu sood (@SonuSood) July 26, 2020
या मदतीविषयी बोलताना सोनू सूद म्हणाला, “या कुटुंबाला बैलाची जोडी देण्याचा विचार करत होतो. मात्र, बैलांना चाऱ्याची व्यवस्था करावी लागेल, देखभाल करावी लागेल असं लक्षात आलं. त्यामुळे आम्ही ट्रॅक्टर देण्याचा निर्णय घेतला. आम्ही ट्रॅक्टर देत असल्याने शेतकरी नागेश्वर आणि त्यांचं कुटुंब खूप आनंदी आहे.”
हेही वाचा :
‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट
राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडे
Sonu Sood donate tractor to Farmer family