AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Sood : पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार, प्रत्येक लहान गावात पोहचणार मदत

सोनू सूद मदतीसाठी पुढे आला आहे. तो काही भागात अडकल्या लोकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतो आहे. सोनू चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात मदतीचे पॅकेज पाठवणार आहे. (Sonu Sood's initiative for flood victims, reaching out to every small village)

Sonu Sood : पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार, प्रत्येक लहान गावात पोहचणार मदत
सोनू सूद
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 1:18 PM

मुंबई : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील (Maharashtra Flood) अनेक जिल्ह्यांमध्ये पूराने कहर केला होता. याठिकाणी अडकलेल्या लोकांना प्रत्येक जण शक्य होईल तेवढी मदत करताना दिसत आहे. आता सोनू सूद (Sonu Sood) सुद्धा मदतीसाठी पुढे आला आहे. तो काही भागात अडकल्या लोकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतो आहे. सोनू चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात मदतीचे पॅकेज पाठवणार आहे.

सोनू सूदनं सांगितला त्याचा प्लॅन

त्याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणला, ‘ही गावं पुरामुळे खूपच प्रभावित झाली आहेत आणि ती सर्व प्रमुख महामार्गांपासून 20-30 किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे तिथं मदत साहित्य पोहोचलेलं नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मूलभूत गरजा जसे बादल्या, ग्लास, भांडी, चटई, कपडे आणि अगदी खाद्यपदार्थ सर्व पाठवलं जात आहे. कुटुंबांना वैयक्तिकरित्या वितरित करण्यासाठी माझी टीम तिथं असेल.

महामार्गालगत बरीच मदत सामग्री आधीच पोहचली आहे, मात्र आतील गावांना अजूनही आवश्यक गोष्टी मिळत नाहीत. सोनू आणि त्याची टीम या आतील गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना मदत साहित्य पाठवलं जात आहे. हे मदत साहित्य संपूर्ण प्रदेशातील 1000 हून अधिक घरांना पुरवलं जाईल आणि मदत साहित्याचा दुसरा ट्रक 4 दिवसात गावांमध्ये पोहोचेल.

या गावकऱ्यांना पुरेसे मदत साहित्य वितरित करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून ते एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहू शकतील. सूद चॅरिटी फाऊंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या गरजू लोकांची मदत करण्यासाठी आपणही प्रयत्न करू या.

संबंधित बातम्या

Bigg Boss OTT Promo : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील हंगाम्याला भोजपुरी तडका लागणार, ‘या’ अभिनेत्रीची ग्रँड एंट्री होणार!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!

Saie Tamhankar: तहे दिल से शुक्रिया… ‘मिमी’तील शमाचे खास फोटो, पाहा सई ताम्हणकरचा हटके अंदाज

जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.