CBFC | सर्टिफिकेटच्या बदल्यात लाखो रुपयांची लाच; अभिनेत्याकडून सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराची पोलखोल

अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. चित्रपटाला सर्टिफिकेट देण्याच्या बदल्यात लाखो रुपये लाच मागितल्याचा खुलासा त्याने केला. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर त्याने पुरावेसुद्धा सादर केले. संबंधितांवर कारवाईची मागणी त्याने केली.

CBFC | सर्टिफिकेटच्या बदल्यात लाखो रुपयांची लाच; अभिनेत्याकडून सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराची पोलखोल
actor vishalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 1:57 PM

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : ‘मार्क अँटनी’ या चित्रपटात झळकलेला प्रसिद्ध तमिळ अभिनेता विशाल याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (CBFC) म्हणजेच सेन्सॉर बोर्डावर धक्कादायक आरोप केले आहेत. विशालने सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचा आणि चित्रपटाला सर्टिफिकेटच्या बदल्यात लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्याच्या ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा खुलासा विशालने केला. सेंसर बोर्डाकडून साडेसहा लाख रुपये मागण्यात आले होते, असं त्याने म्हटलंय.

मुख्यमंत्री-पंतप्रधानांकडे विनंती

या व्हिडिओच्या सुरुवातीला विशाल हे स्पष्ट करतो की, हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही. मात्र त्याच्या ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाबद्दलचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला. विशालने हे सुद्धा स्पष्ट केलं की त्याच्या टीमने चित्रपटाच्या सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज केलं होतं आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना शेवटच्या क्षणी हे पाऊल उचलावं लागलं होतं.

हे सुद्धा वाचा

सेन्सॉर बोर्डाकडून लाच

“मुंबईतल्या सेन्सर बोर्डाच्या ऑफिसमध्ये जे घडलं ते पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या टीममधल्या एका व्यक्तीला मी सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाठवलं होतं. त्याच दिवशी सर्टिफिकेट हवा असेल तर लाखो रुपये मोजावे लागतील असं त्याला म्हटलं गेलं. अखेर आमच्याकडे कोणताच पर्याय नव्हता,” असं विशालने सांगितलं.

सर्टिफिकेटच्या बदल्यात लाखो रुपये

‘मार्क अँटनी’ य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून साडेसहा लाख रुपये लाच मागण्यात आली, असं विशालने सांगितलं. या साडेसहा लाखांपैकी तीन लाख रुपये सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी आणि उर्वरित साडेतीन लाख रुपये सर्टिफिकेटसाठी मागण्यात आले. विशालने या व्हिडिओत पुढे व्यवहार करणाऱ्या महिलेचाही उल्लेख केला. त्याचप्रमाणे इतरांनी चित्रपट सादर केल्यानंतर चार लाख रुपये दिल्याचाही खुलासा त्याने केला. याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती विशालने या व्हिडिओद्वारे केली. तो म्हणाला, “आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. आम्ही दोन हप्त्यांमध्ये त्यांना पैसे दिले. जर सरकारी कार्यालयात अशीच परिस्थिती असेल तर मी उच्च अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो.”

मुंबईच्या सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये भ्रष्टाचार

विशालने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात नाही. हे मी पचवू शकत नाही. विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये आणि सेंसोर बोर्डाच्या मुंबई ऑफिसमध्ये याहूनही वाईट घडतंय. हे मी माझ्यासाठी नाही तर इतर निर्मात्यांसाठी करतोय. माझे कष्टाने कमावलेले पैसे भ्रष्टाचारात गेले हे मी सहन करू शकत नाही.’ विशालने या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांना टॅक केलं आहे. यासोबतच त्याने ज्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले त्याचीही माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे. विशालच्या या व्हिडिओनंतर अनेकांनी न्यायाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार उघड केल्याने त्याचं कौतुकही केलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.