Video | कॅमेरासमोरच अभिनेत्रीकडून एका व्यक्तीच्या पाठीत धपाटा; म्हणाली “तो त्याच लायकीचा”
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मंचू हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती एका व्यक्तीच्या पाठीत कॅमेरासमोरच धपाटा देताना दिसत आहे. त्या व्हायरल व्हिडीओवर आता लक्ष्मीने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी मंचू ही ‘मॉनस्टर’सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहन बाबू यांची ती मुलगी आहे. लक्ष्मी अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे आणि मुलाखतींमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यातील लक्ष्मीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. रेड कार्पेटवर ती जेव्हा मुलाखत देत असते, तेव्हा एक व्यक्ती अनवधानाने तिच्या कॅमेरासमोर जातो. तेव्हा लक्ष्मी रागात त्या व्यक्तीला मारते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. त्याविषयी आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा ‘SIIMA’ (साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स) नुकताच पार पडला होता. हा पुरस्कार सोहळा दुबईत आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार सोहळ्यादरम्यान जेव्हा ती रेड कार्पेटवर माध्यमांना मुलाखत देत असते, तेव्हा ती एका व्यक्तीवर भडकते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, लक्ष्मी मुलाखत देत असताना एक व्यक्ती तिच्या कॅमेरासमोरून जातो. तेव्हा ती रागाच्या भरात त्याला मारते. त्यानंतरही जेव्हा दुसरी व्यक्ती कॅमेरासमोरून जाते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट पहायला मिळतोय. ‘कॅमेरासमोर येऊ नका’, असं ती ओरडल्यानंतर दुसरी व्यक्ती मागे जाते.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओबद्दल बोलताना लक्ष्मी म्हणाली, “मी एक अभिनेत्री आहे आणि असं कोणत्यात कलाकारासोबत घडलं नाही पाहिजे. त्या व्यक्तीला मारल्याचा मला काहीच पश्चात्ताप नाही. कारण काही लोकांना सर्वसामान्य शिष्टाचार नसतो. तो त्याच लायकीचा होता, म्हणून मी त्याला मारलं. माझ्या कॅमेऱ्यासमोर कोणीही आलेलं मला सहन होणार नाही.”
लक्ष्मी मंचू ही अभिनेत्रीसोबतच निर्मातीसुद्धा आहे. तिने अमेरिकन टीव्ही सीरिजमध्येही काम केलं आहे. तिने ‘लास वेगास’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये तिने सरस्वतीची भूमिका साकारली होती. पहिल्या चित्रपटात तिची छोटीशीच भूमिका होती.