AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni | प्रेमात कमनशिबी ठरली ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री; धोनीसोबतच्या अफेअरला म्हणाली ‘डाग’

2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राय लक्ष्मीने या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे वक्तव्य केलं होतं. धोनीसोबतच्या रिलेशनशिपला तिने आयुष्यातील डाग असल्याचं म्हटलं होतं. मात्र या अफेअरबद्दल धोनीकडून कधीच कोणती प्रतिक्रिया समोर आली नाही.

MS Dhoni | प्रेमात कमनशिबी ठरली 'ही' दाक्षिणात्य अभिनेत्री; धोनीसोबतच्या अफेअरला म्हणाली 'डाग'
Raai Laxmi and MS DhoniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 11:09 AM

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नगमाच्या ‘जुली 2’ या बायोपिकमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री राय लक्ष्मीची चांगलीच लोकप्रियता आहे. राय लक्ष्मी तिच्या भूमिकांसोबतच ग्लॅमरस अंदाजासाठी विशेष ओळखली जाते. काही चित्रपटांमध्ये तिने बोल्ड सीन्सही दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा झाली होती. ‘जुली 2’मधील तिचे इंटिमेट सीन्ससुद्धा व्हायरल झाले होते. राय लक्ष्मीचं खासगी आयुष्य नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रकाशझोतात आलं आहे.

राय लक्ष्मीचा जन्म 5 मे 1989 रोजी बेळगावात झाला. तिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘जुली 2’ या वादग्रस्त चित्रपटामुळे तिला विशेष ओळख मिळाली. इतकंच नव्हे तर क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळेही ती प्रकाशझोतात होती. धोनीसोबतच्या अफेअरला राय लक्ष्मीने एका मुलाखतीत ‘आयुष्यातील डाग’ असं म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

पाच वेळा प्रेमभंग

राय लक्ष्मीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तिने स्वत:च्या मनाला कठोर बनवलं. प्रेमाच्या बाबतीत ती नेहमीच कमनशिबी ठरली. “मी स्वत: फार भावनिक असल्याने कोणावरही लवकरच विश्वास करते. म्हणूनच माझी फसवणूक होते”, असं ती म्हणाली होती. याच मुलाखतीत राय लक्ष्मीने पाच वेळा रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. मात्र एकाही नात्यात तिला यश मिळालं नाही.

View this post on Instagram

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi)

महेंद्र सिंह धोनीसोबत अफेअर

राय लक्ष्मीने एकेकाळी क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीलाही डेट केलं होतं. 2008 मध्ये ती आयपीएलच्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड ॲम्बेसेडर बनली होती. तेव्हा धोनी या संघाचा कर्णधार होता. त्यावेळी दोघांमधील जवळीक वाढली होती. 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राय लक्ष्मीने या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे वक्तव्य केलं होतं. धोनीसोबतच्या रिलेशनशिपला तिने आयुष्यातील डाग असल्याचं म्हटलं होतं. मात्र या अफेअरबद्दल धोनीकडून कधीच कोणती प्रतिक्रिया समोर आली नाही.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.