‘रामायण’ चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेबाबत सुपरस्टार यशने केला मोठा खुलासा, म्हणाला….
निर्माता नितेश तिवारी याच्या 'रामायण' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या चित्रपटासाठी रणबीर आणि आलियाच्या नावावरून देखील गोंधळ सुरू आहे.
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता यश हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘केजीएफ’ या चित्रपटातून तो चांगलाच फेमस झाला होता. त्याचं रॉकी भाई हे पात्र मोठ्या प्रमाणात गाजलं आहे. तसंच त्याचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला आहे. यशचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे.
आता यशच्या नवीन चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्माता नितेश तिवारी याच्या ‘रामायण’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या चित्रपटासाठी रणबीर आणि आलियाच्या नावावरून देखील गोंधळ सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ चित्रपटात रावणची भूमिका यश साकारणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. याबाबत आता स्वत: यशनं स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यश आणि त्याची पत्नी राधिका मुलांसह त्याच्या गावी म्हैसूरला गेला होता. यावेळी त्यानं कुटुंबासह नंजुंदेश्वर मंदिराला भेट दिली. यादरम्यान यशनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
.@TheNameIsYash explaining the reason behind the delay of #Yash19.#Yash #YashBoss pic.twitter.com/eqgwjc2g7S
— Bhargavi (@IamHCB) June 21, 2023
माध्यमांशी बोलताना यशनं त्याच्या आगामी ‘यश 19’ या चित्रपटाबाबत सांगितलं. तो म्हणाला की, चाहते त्यांच्या मेहनतीच्या पैशातून चित्रपट पाहतात. मला त्यांच्या पैशांची कदर आहे. आम्ही प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करत आहोत कारण चित्रपट हे संपूर्ण देशच नाही तर जगही पाहत आहे. त्यामुळे मला या जबाबदारीची जाणीव आहे. आम्ही खूप मेहनत घेत आहोत आणि आम्ही जे मिळून काम करत आहोत त्यावर प्रत्येकजण खुश होईल.
दरम्यान, यशने रामायणातील रावणाच्या पात्राच्या ऑफरबाबतही उघडणे सांगितलं. तो म्हणाला की, तो भूमिका मिळवण्यासाठी कोणाकडे गेला नसून त्याच्या कामामुळे प्रत्येकाला त्याच्याकडे ती भूमिका आली असून लवकरच याबाबत मोठी घोषणा करणार असल्याचं जय म्हणाला.