Allu Arjun | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनंतर आता तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) देखील कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
मुंबई : या क्षणी भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत दररोज कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होत असून, हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. आता अनेक सेलिब्रिटीही या प्राणघातक विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनंतर आता तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) देखील कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली (South Superstar Allu Arjun tested corona positive).
अभिनेता अल्लूने हा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं, ‘सर्वांना नमस्कार, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती करतो की, त्यांनी देखील आपापली चाचणी करून घ्यावी. घरी रहा, सुरक्षित रहा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लस टोचून घ्या. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, काळजी करू नका कारण मी ठीक आहे. ‘
पाहा अल्लू अर्जुनची पोस्ट
Hello everyone! I have tested positive for Covid. I have isolated myself. I request those who have come in contact with me to get tested. I request all my well wishers and fans not to worry as I am doing fine . Stay home, stay safe . pic.twitter.com/CAiKD6LzzP
— Allu Arjun (@alluarjun) April 28, 2021
(South Superstar Allu Arjun tested corona positive)
नुकताच मालदीववरून परतला होता अभिनेता
अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. यानंतर तो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या आगामी ‘पुष्पा’ चित्रपटाचा टीझरही रिलीज केला होता, जो त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता (South Superstar Allu Arjun tested corona positive).
चाहते पडले काळजीत!
सुपरस्टार अल्लू अर्जुनने ही माहिती देताच त्याचे चाहते खूप काळजीत पडले आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. त्याला लवकर बरे वाटावे म्हणून त्याचे इंडस्ट्रीमधले मित्र-मंडळी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.
अल्लूची कारकीर्द
दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने 2003 मध्ये ‘गंगोत्री’ चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले. अर्जुनने ‘फिल्मफेअर’ आणि ‘नंदी’ पुरस्कार जिंकले आहेत. त्याने मनोरंजन विश्वाला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अल्लू अर्जुनचे स्नेहा रेड्डीशी लग्न झाले आहे. अल्लू आणि स्नेहाचे 6 मार्च 2011 रोजी लग्न झाले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.
(South Superstar Allu Arjun tested corona positive)