‘माल’ म्हणजे ‘ड्रग्ज’ नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल: उज्ज्वल निकम

माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल. दीपिका पदुकोण ही ग्रुपची अडमिन होती असे देखील तपासात पुढे आले आहे. तरी तिला हे सिद्ध करावे लागेल की हे चॅटिंग ड्रग्ज संदर्भात नव्हते, असं निकम म्हणाले.

'माल' म्हणजे 'ड्रग्ज' नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल: उज्ज्वल निकम
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 2:21 PM

मुंबई: व्हॉट्सअॅप चॅटवरून माल है क्या असं विचारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे सिद्ध करावे लागेल, तरच तिची या प्रकरणातून सुटका होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केली. (Ujjwal Nikam reaction on Bollywood Drugs Connection)

‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत करताना अॅड. उज्जवल निकम यांनी बॉलिवूड ड्रग्जप्रकरण आणि दीपिकाच्या व्हॉट्सअॅप चॅटवर प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हॉटअप चॅटिंग हा डॉक्युमेंटरी पुरावा आहे. फिर्यादीला हे सिद्ध करावे लागेल की ते ड्रग्जचे सेवन करत नव्हते. माल हे क्या? म्हणजे नेमकं काय? माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल. दीपिका पदुकोण ही ग्रुपची अडमिन होती असे देखील तपासात पुढे आले आहे. तरी तिला हे सिद्ध करावे लागेल की हे चॅटिंग ड्रग्ज संदर्भात नव्हते, असं निकम म्हणाले.

रिया चक्रवर्तीची मॅनेजर ही ड्रग्ज पेडलर असल्याने व्हॉट्सअप चॅटिंगवरून पुढील काळात दीपिकाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. परंतु NTBS कायद्यानुसार ड्रग्सचे सेवन करणं हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी 1 वर्षाची शिक्षा आणि 20 हजार रुपये दंड होऊ शकतो. परंतु, जर या तिन्ही अभिनेत्रींनी जर चुकीने ड्रॅग्ज सेवन झाल्याची कबुली दिली तर ते शिक्षेपासून वाचू शकतात, असंही निकम म्हणाले.

या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स दिला आहे. कारण या प्रकरणाबाबत त्यांना अधिक पुरावे जमा करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता येईल. आणखी तपास सुरू असल्यामुळे त्यांना शिक्षा होईल की नाही, असे सांगता येणार नाही. हा तपासाचा भाग असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Ujjwal Nikam reaction on Bollywood Drugs Connection)

ड्रग्ज सेवन केलं नाही, तिघींचं स्पष्टीकरण

दरम्यान, एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी आलेल्या दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने ड्रग्ज सेवन केलं नसल्याचं चौकशी अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केलं. मात्र दीपिकाने ड्रग्जबाबत चॅट केल्याची कबुली दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, श्रद्धा कपूरने ‘छिछोरे’च्या पार्टीत भाग घेतल्याचं स्पष्ट चौकशीत मान्य केलं आहे.

संबंधित बातम्या: 

व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

Drugs Case LIVE | मी छिछोरेच्या पार्टीला होते, पण ड्रग्ज घेतलं नाही : श्रद्धा कपूर

दीपिका आणि साराचा ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार; चौकशी सुरूच

(Ujjwal Nikam reaction on Bollywood Drugs Connection)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.