Special Report on Jai Bhim Movie : ‘जय भीम’चाच बोलबाला, आयएमडीबी रेटिंग ते के. चंद्रूपर्यंत चित्रपटाबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी

" मै किस्मत पे भरोसा नही करता, सच्चाई पे करता हूं! , "चोर कौनसी जाती में नही होता? मेरी,तुम्हारी सब की जाती में बडे बडे चोर होते है, पहले लोगों को जाती में बाटना छोड दो!" हे करारी संवाद ऐकल्यावर हा चित्रपट कळतो. हा चित्रपट आपल्याला काय सांगू पाहतोय हे कळतं.

Special Report on Jai Bhim Movie : ‘जय भीम’चाच बोलबाला, आयएमडीबी रेटिंग ते के. चंद्रूपर्यंत चित्रपटाबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी
jai bhim
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 8:25 PM

मुंबई : सध्याचे युग हे डिजिटलचं युग आहे. थिएटरमध्ये सिनेमा जाऊन सिनेमा बघण्याचे दिवस गेले. आज-काल ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांसारख्या डिजिटल माध्यमांवर अनेक सिनेमे रिलीज होत असतात. त्यापैकी अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करतात. असाच एक चित्रपट सध्या भारतवासियांच्या मनावर गारुड घालतोय. त्या सिनेमाचं नाव आहे जय भीम… हा तामिळ चित्रपट तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. तो समाजातील वास्तवतेचे भान दाखवून देतो आणि भारतीय समाजमनावर जातिव्यवस्थेचा पगडा किती गहिरा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो..

चित्रपटाचे कथानक 

हा चित्रपट नव्वदीच्या दशकात झालेली सत्या कथा आहे. या चित्रपटामध्ये आदिवासी समाजातील पुरुषांना पोलीस जबरदस्तीने खोट्या आरोपांमध्ये गुंतवतात.त्यांचा अतोनात छळ करतात आणि पडद्यावर असे दृश्य पाहून तुम्ही देखील रागाने चवताळून उठाल.पोलीस त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात. हे संपूर्ण कथानक त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकानू याच्या भोवती फिरताना दिसते. त्याला पोलीसांनी नेल्यानंतर त्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवाधिकार प्रकरणांवर विशेष लक्ष देतो. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य समोर येते, ही या चित्रपटाची कथा आहे. हे संपूर्ण कथानक न्यायालय, तमिळनाडूमधील छोट्याशा गावात आणि जेलमध्ये झाले आहे.

थेट मनावर वार

हा चित्रपट केवळ पोलिसांच्या क्रुरतेवर भाष्य करणारा नाहीये. तर क्रूर हिंसाचाराला जन्म देणार्‍या मानसिकतेचा आहे. या चित्रपटामधील थीम साधी ठेवली गेली होती. जेणेकरून प्रेक्षकांना स्वतःला यातील फरक जाणवू शकेल. उच्च आणि नीच असा भेदभाव सामान्यपणे न मांडता तो रोखठोकपणे सांगितले आहे. जसे की या कथेत राजकनूची पत्नी  गावतील सरपंचाकडे मदतीसाठी जाते. तेव्हा तीला तेथे जातीवचक बोलून त हकलून दिले जाते. त्यानंतर राजकनू आणि त्याच्या पत्नीला मदत करणाऱ्या शिक्षिका देखील नेत्यांकडे दाद मागताता की यांचे नाव मतदान यादीत घ्या. तेव्हा तेथील उपस्थित नेता आता मतांसाठी या खालच्या जातीच्या लोकांच्या घरात त्यांची मनधरणी करायला जायच का ? असा प्रश्न केला यावरुन समाजातील परिस्थितीची भिषणता लक्षात येते.

वातावरण निर्मिती

चित्रपटात पोलिसांच्या छेडछाडीची दृश्ये सर्वात त्रासदायक वाटतात. चित्रपट पाहून झाल्यावर दिवसभर ही दृष्य तुमच्या समोरुन जाणार नाहीत. त्या आदिवासींच्या वेदना जाणवल्याशिवाय राहाणार नाही असे वातावरण निर्माण करण्यासाठी चित्रपटाच्या छायांकनालाही इथे श्रेय द्यायला हवे.

सिनेमॅटोग्राफीचे यश

जर, तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, त्याची सिनेमॅटोग्राफी कथानकासोबत चालते. चंद्रू आणि आयजी पेरुमलसामी यांच्या पात्रांप्रमाणे. ज्यांची भूमिका सूर्या आणि प्रकाशराज यांनी केली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला दोन्ही पात्रांची विचारसरणी एकमेकांपासून उत्तर-दक्षिण दिशेने सरकते. तर, एका सीनमध्ये चंद्रू आंदोलन करताना दिसत आहेत तर दुसरीकडे आयजी पेरुमलसामी या गोष्टीत चंद्रूला काही न बोलता बरंच काही सांगून जातता. त्याच प्रमाणे गावतील सरपंचाची बायको त्या आदिवासींना पाहण्याच्या तो लूक सर्व काही सांगून जातो. या दृष्टीला खरंच दाद द्यायला हवी! चित्रपटाचा सर्वात मोठा स्टार सुर्या वाटतो पण या चित्रपटाची स्टार सेंगानी आहे. म्हणजे राजकनुची पत्नी. अभिनेत्री लिझो मॉल जोसने हे पात्र साकारले आहे. राजकनू तुरुंगात गेल्यावर कथेचा भार सेंगानीवर पडतो. जी तिने उत्तमरित्या स्वीकारली. त्याच्यासमोर सूर्या आणि प्रकाशराजसारखे अभिनेते होते. पण तरीही ती काहीशी वेगळी ठरली आहे.‘जय भीम’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

सुपरस्टार सूर्या शिवकुमार यांनी साकारलेले के. चंद्रू नक्की आहेत तरी कोण ?

सुपरस्टार सुर्या शिवकुमार यांनी साकारलेले के. चंद्रू हे माजी न्यायमूर्ती चंद्रू आहेत. या चित्रपटाच्या शेवटी जाणाऱ्या एका फ्रेममध्ये के. चंद्रू यांच्या बद्दल आपल्याला माहिती मिळते. माजी न्यायमूर्ती चंद्रू (माजी न्यायमूर्ती के. चंद्रू) यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला आहे. सुर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटात त्याच्या 1995 च्या खऱ्या प्रसंगाची कथा दाखवण्यात आली आहे. सूर्याचे हे पात्र मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू (निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू) यांच्याकडून प्रेरित, ज्यांनी अनेक वर्षे वकील म्हणून आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. सुरियाच्या ‘जय भीम’ या चित्रपटात निवृत्त न्यायाधीश चंद्रू यांच्या एका प्रकरणाची कथाही घेण्यात आली आहे. सुर्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदाच वकिलाची भूमिका साकारली आहे. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रू यांची भूमिका साकारण्यापूर्वी सूर्या यांनी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रू त्यांची भेट देखील घेतली होती.समाजातील अनेक गोष्टींपासून आपन अनभिज्ञ असतो. पण अशीच एक कथा घेऊन सुर्या आपल्या समोर आला आहे. सुर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटात त्याच्या 1995 च्या खऱ्या प्रसंगाची कथा दाखवण्यात आली आहे. न्यायमूर्ती चंद्रू, जे त्यावेळी वकील होते, त्यांनी मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध धैर्याने लढा दिला. इरुलर समाजातील एका आदिवासी महिलेने पोलिसांकडून कोठडीतील छळ आणि पोलिस कोठडीत पतीचा मृत्यू याविरोधात न्यायालयात लढा दिला. न्यायमूर्ती चंद्रू यांनी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली होती. न्यायाधीश चंद्रू हे भारतातील प्रख्यात न्यायाधीशांपैकी एक आहेत आणि त्यांचा ऐतिहासिक ट्रॅक रेकॉर्ड आहे.

चित्रपटाला घेऊन केला जाणार वाद नक्की काय आहे ?

‘जय भीम’ चित्रपटातील एका सीनमध्ये एक व्यक्ती हिंदी भाषेत प्रकाश राज यांच्याशी बोलत असतो. त्यावेळी प्रकाश राज त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. त्यानंतर ती व्यक्ती मला का मारले असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर प्रकाश राज यांनी ‘तमिळमध्ये बोल’ असे म्हटले आहे. याच सीनवर सध्या आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटामधील या सिनमुळे सोशल मीडियावर देखील अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

आयएमडीबी रेटिंगमध्येही अव्वल

या चित्रपटाला दमदार असे आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे. आयएमडीबीने या चित्रपटाला 9.7 रेटिंग दिले आहे. त्यामुळे मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा ?

चित्रपटात ,नाटक, कथा, कादंबरी सर्व साहित्य प्रकार आपल्या समाजरचनेचा आरसा असतात. समाजात होत असणाऱ्या गोष्टी, प्रश्न चित्रपटांच्यामध्यमातून आपल्या समोर येतात. असाच एक प्रश्न घेऊन हा चित्रपट आपल्या समोर येतो. उत्तम सिनेमॅटोग्राफी, अप्रतिम वातावरण निर्मिती आपल्याला नायक सोबत त्याच्या दृष्टीने चित्रपट दाखवण्यास मदत करतात. तुम्ही जर दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते असाल तर Amazon Prime Video वर हा चित्रपट एकदा नक्कीच पहा!

साउथ सुपरस्टार सूर्याचे या आधीचे चित्रपट

साउथ सुपरस्टार सूर्या नेहमीच एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर येतो. या चित्रपटाआधी सूर्याचा ‘सोहराई पोटरु’ (उडान) नावाचा चित्रपट आला होता. ह्या चित्रपटाची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये त्यांनी एका भारतीस वायू दलामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका केली होता. ज्याला गरिबांसाठी 1 रूपयामध्ये एअरलाईल सुरू करायची असते. स्वत:च्या जिद्दीवर नायक ही गोष्ट करतो देखील. अशीच एक नविन कथा घेऊन सूर्या आता आपल्या समोर आला आहे.

संबंधित बातम्या : 

तुरुंगातून सुटल्यानंतर आर्यन खान काय वाचतोय?; स्वीडिश लेखकाचं हे पुस्तक माहीत आहे काय?

Major | ‘देशाला सांभाळणं सैनिकाची जबाबदारी आहे!’, पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कथा सांगणारा ‘मेजर’चा जबरदस्त टीझर!

Na Jaa | ‘सूर्यवंशी’चे ‘ना जा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफच्या धमाकेदार मुव्ह्सवर प्रेक्षकही धरतील ठेका!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.