Special Story | ‘तो’ की ‘ती’? हा तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न…

एक व्यक्ती म्हणून आपण कसे जगावे, याचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा त्या व्यक्तीचा असतो. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित झाल्यास, त्याचे उत्तर मिळेलच याची खात्री देता येत नाही.

Special Story | ‘तो’ की ‘ती’? हा तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न...
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 11:02 AM

मुंबई : ‘आपलं ठेवायचं झाकून नि दुसऱ्याचं पाहायचं वाकून’ ही म्हण तुमच्या-आमच्यापैकी प्रत्येकाला लागू होते. कोणी कितीही आव आणला, तरी इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात आपल्याला रस असतोच. मग प्रेम प्रकरण (लफडी), भांडण तंटे, लैंगिकता यासारखे ‘चघळण्याचे विषय’ आले, की कोणाचेही कान टवकारतात. जिथे शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या खासगी जीवनात आपण कांकणभर जास्त इंटरेस्ट घेतो, तिथे बॉलिवूड सेलिब्रिटी असल्यास काय सांगावं. नुकतंच बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे (Fashion Designer Swapnil Shinde) याने सोशल मीडियावर एक लक्षवेधी पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली. स्वप्नील शिंदेने नव्या वर्षात त्याचं नवं रुप आणि नवं अस्तित्त्व समोर आणलं. स्वप्निलने आता आपण ‘ट्रान्सवुमन’ झाल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं. स्वप्निल शिंदेची आता ‘साईशा शिंदे’ झाली आहे (Special Story on celebs changing their genders and homosexuality in India).

मनिष मल्होत्रा, रोहित बाल, सब्यसाची मुखर्जी, तरुण ताहिलानी असे बॉलिवूडमधील आघाडीच्या फळीतील फॅशन डिझायनर प्रसिद्ध आहेत. स्वप्नील शिंदे या मराठमोळ्या नावाचा ठसाही अलिकडच्या काळात उमटू लागला होता. सनी लिओन, करिना कपूर, कतरिना कैफ अशा अग्रणी अभिनेत्रींसोबत त्याने काम केलं आहे. मात्र, त्याच्या एका जाहीर कबुलीने त्याला पुन्हा एकदा चर्चेत आणलं आहे.

स्वप्नीलचा धाडसी निर्णय!

‘जे माझं अस्तित्वच नाही, त्यात जगू कसं?’, असा प्रश्न पडलेल्या स्वप्नीलने अखेर सर्जरी करुन संपूर्ण ‘स्त्री’ होण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर, इतरांप्रमाणेच स्वप्नीलनेही त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. यासंदर्भात सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये स्वप्नीलने त्याच्या नव्या रुपातले अर्थात ‘साईशा’चे फोटो आणि एक भावुक पोस्ट देखील लिहिली आहे. यात त्याने दोन चेहरे आणि मनं घेऊन जगण्याचं दुःख व्यक्त केलं आहे.

स्वप्नील पहिलाच नाही!

लिंग बदल करून स्वतःची ओळख बदलणारा स्वप्नील पहिलाच सेलिब्रिटी नाही. या आधीही अनेक सेलिब्रिटींनी लैंगिक बदलांविषयी जाहीर कबुली देईली आहे. काहींनी आपण समलैंगिक असल्याचे म्हटले, तर काहींनी थेट लिंग बदल शस्त्रक्रिया केली आहे (Special Story on celebs changing their genders and homosexuality in India).

मानवेंद्र सिंह गोहिल

राजपिपलाच्या राजघराण्यातील राजा मानवेंद्रसिंह गोहिल यांनी 2002मध्ये आपण समलिंगी असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या जाहीर कबुलीने मोठी खळबळ माजली होती. त्यांचे मध्यप्रदेशातील एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र, आता ते विभक्त झाले असून, त्यांना भारताचा पहिला समलिंगी राजकुमार म्हणून ओळखले जाते.

रोहित बाल

बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांनी देखील आपण समलिंगी असल्याची कबुली दिली होती.

बॉबी डार्लिंग

प्रसिद्ध अभिनेता पंकज शर्माने लिंग बदल शस्त्रक्रिया करून स्त्री होण्याचा निर्णय घेतला होता. सध्या पंकज शर्मा ‘बॉबी डार्लिंग’ या नावाने ओळखला जातो.

एलन पेज

कॅनडियन कलाकार एलन पेजने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून आपण ट्रान्सजेंडर असल्याची घोषणा केली होती. यापुढे आपण ‘एलियट पेज’ असल्याचं तिने जाहीर केलं. पाच वर्षांपूर्वी स्वतःची समलैंगिक अशी ओळख सांगणाऱ्या पेजने आता आपण ट्रान्सजेंडर असल्याचं मनमोकळेपणाने स्वीकारलं आहे.

सब्यासाची मुखर्जी

जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी याने देखील एका कार्यक्रमात आपण समलिंगी असल्याची कबुली दिली होती. अभिनेत्री विद्या बालनने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने ही गोष्ट जाहीरपाने काबुल केली होती.

याशिवाय करण जोहर, मनीष मल्होत्रा, कादंबरी लेखक विक्रम सेठ, अभिनेता सुशांत दिग्विकर, व्हीजे अँडी यांची देखील नावे या यादीत सामील आहेत (Special Story on celebs changing their genders and homosexuality in India).

बदल स्वीकारण्याचा धाडसी निर्णय

शरीर एक आणि मन मात्र दुसरेच, असं व्यक्तिमत्त्व घेऊन जगण्यापेक्षा सरळ आपण जसे आहोत, तसेच स्वतःला स्विकारण्याचं धाडस या सेलिब्रिटींनी दाखवलं. काहींना हे सत्य स्वीकारण्यास वेळ लागला, मात्र त्यांनी कोणतीही तमा न बाळगता आपलं व्यक्तिमत्त्व जगासमोर जाहीर केलं. यातील अनेकांवर वेगवेगळ्या स्तरांतून टीकाही झाली. मात्र, कालांतराने लोकांनी देखील त्यांचा आनंदाने स्वीकार केला.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

सध्याच्या काळात लोकांची मानसिकताही काहीशी बदलली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आणि कायद्यातले बदल यामुळे लोकांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. काही वर्ष मागे वळून पहिले असता त्याकाळातील आणि आजच्या काळातील जमीन-आस्मान फरक लगेच दिसून येतो. त्याकाळात आपण पुरुष नसून, स्त्री आहोत किंवा स्त्री नसून पुरुष आहोत, हे सांगण्याचे धाडस देखील कोणी करत नव्हते. मात्र, आजच्या घडीला अगदी उघडपणे या गोष्टी मान्य केल्या जातात. आधी समाज-लोक काय म्हणतील?, असा गहन प्रश्न आवासून असायचा. हा प्रश्न आताही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. मात्र, तरीही काही अंशी यात फरक पडला आहे. याला कदाचित बदलत्या जीवनशैलीचा सकारात्मक परिणाम असेही म्हणता येईल.

फायदा की तोटा?

समलैंगिक किंवा लिंगबदल हा विषय फायद्याचा का तोट्याचा?, असा प्रश्नच मुळात चुकीचा ठरू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपण कसे जगावे, याचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा त्या व्यक्तीचा असतो. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित झाल्यास, त्याचे उत्तर मिळेलच याची खात्री देता येत नाही. आजही अनेक ठिकाणी किंवा अनेक समाजात या गोष्टींना मान्यता नाही. परंतु, एखाद्या व्यक्तीने स्वतःचा मार्ग निवडल्यास, त्याचा निर्णयाचा अनादर करता येत नाही, आणि महत्त्वाची बाब म्हणजे कायद्यानेही आता ‘कलम 377’ लागू करत कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता सर्वाना मनाप्रमाणे जगण्याची मुभा मिळाली आहे.

(Special Story on celebs changing their genders and homosexuality in India)

हेही वाचा :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.