सई-सिद्धार्थच्या आगळ्या-वेगळ्या लव्हस्टोरीनं वाढवली उत्सुकता; पहा ‘श्रीदेवी प्रसन्न’चा टीझर

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी आगामी 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही नवीकोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

सई-सिद्धार्थच्या आगळ्या-वेगळ्या लव्हस्टोरीनं वाढवली उत्सुकता; पहा 'श्रीदेवी प्रसन्न'चा टीझर
Sridevi Prasanna Teaser Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 12:10 PM

मुंबई : 4 जानेवारी 2024 | लग्न का करावं? कुणाशी करावं? याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या आगामी चित्रपटात लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री सई ताम्हणकर आणि मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हँडसम हंक सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ही नवीकोरी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. टीझरमधील सई आणि सिद्धार्थची केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ या दोघांसोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी अदिती मोघे यांनी उचलली असून मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर

‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाचं नाव फक्त फिल्मी नाही तर याचं कथानकही टोटल फिल्मी असल्याचं पहायला मिळत आहे. ‘लव ॲट फर्स्ट साईट’चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न हा मॅट्रिमोनी साइटवर ‘श्रीदेवी’ या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्टदेखील करते. त्यानंतर दोघांची भेट होते आणि त्यापुढील काही गमतीजमतींची झलक या टीझरमध्ये पहायला मिळतो. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही, त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं हे ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात पहायला मिळेल. विशाल विमल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.