Phulala Sugandh Maticha | ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम जिजी अक्का आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून

अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी जिजी अक्काची भूमिका निभावली आहे. आदिती देशपांडे या दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या स्नुषा. (Phulala Sugandh Maticha Aditi Deshpande )

Phulala Sugandh Maticha | 'फुलाला सुगंध मातीचा' फेम जिजी अक्का आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून
फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री अदिती देशपांडे
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:41 PM

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिका गेल्या काही आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. अनेक आठवडे टॉप 5 मध्ये केवळ स्टार प्रवाहच्याच मालिका पाहायला मिळत आहेत. ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala sugandh maticha) ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत जिजी अक्काची भूमिका भाव खाऊन जात आहे. (Star Pravah Marathi Serial Phulala Sugandh Maticha Jiji Akka Fame Actress Aditi Deshpande is Sulabha Deshpande’s Daughter in law)

प्रख्यात अभिनेत्री अदिती देशपांडे (Aditi Deshpande) ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत जिजी अक्का ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. जामखेडकर कुटुंबाचा ती कणा. कमी शिकलेली सून असावी, अशी जिजी अक्काची मुलाच्या लग्नापूर्वी अट असते. मात्र आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कीर्तीची लगीनगाठ जिजी अक्कांचा मुलगा शुभमशी बांधली जाते. लग्नाच्या वेळी जिजी तिच्या होणाऱ्या सूनेच्या शिक्षणाविषयी अनभिज्ञ असते. परंतु अचानक लग्नानंतर कीर्तीच्या शिक्षणाविषयी समजतं, तेव्हा जिजी अक्काची भूमिका काय असते, हे मालिकेत पाहायला मिळालं.

जिजी अक्का काहीशी काटेरी फणसाप्रमाणे आहे. मुलगा शुभम आणि सून कीर्ती यांच्यावर माया करणारी आणि प्रसंगी कानही धरणारी ही जिजी अक्का. कीर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर, तर शुभमची भूमिका अभिनेता हर्षद अतकरी साकारत आहे. अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी जिजी अक्काची भूमिका वकुबीने निभावली आहे. आदिती देशपांडे या दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या स्नुषा.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सुलभा देशपांडे

सुलभा देशपांडे यांनी शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात साकारलेली बेणारे बाईंची भूमिका लोकप्रिय झाली होती. सखाराम बाईंडर, दुर्गा झाली गौरी, बाबा हरवले आहेत यासारखी काही नाटकंही त्यांनी केली. याशिवाय जैत रे जैत, भूमिका, विजेता, इजाजत, सलाम बॉम्बे अशा अनेक हिंदी मराठी कलाकृतींमध्ये त्यांनी व्यक्तिरेखा केल्या आहेत. (Star Pravah Marathi Serial Phulala Sugandh Maticha Jiji Akka Fame Actress Aditi Deshpande is Sulabha Deshpande’s Daughter in law)

Sulabha Deshpande

दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्मात्या

आदिती देशपांडे यांनी नॉट ओन्ली मिसेस राऊत (2003) या सिनेमात साकारलेली विद्या राऊतची भूमिका प्रचंड गाजली होती. याशिवाय पक पक पकाक, मायबाप, जोगवा, वजनदार, दशक्रिया यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. नॉट ओन्ली मिसेस राऊत या सिनेमाची निर्मितीही त्यांनीच केली होती. या सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही प्राप्त झाला होता.

हिंदी मालिकांमध्येही दबदबा

दरम्यानच्या काळात अदिती देशपांडे यांनी आपला मोर्चा हिंदी मालिकांकडेही वळवला होता. पेहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, मै मायके नही जाऊंगी यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर त्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत जिजी अक्का ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

संबंधित बातम्या :

सुसल्या बदलली, ‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेत्री साकारणार भूमिका

आई मराठी, मुस्लीम वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी, ‘देवमाणूस’फेम नेहा खानची संघर्षगाथा

(Star Pravah Marathi Serial Phulala Sugandh Maticha Jiji Akka Fame Actress Aditi Deshpande is Sulabha Deshpande’s Daughter in law)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.