‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात ‘या’ मालिकेने पटकावला महाराष्ट्राची महामालिकेचा मान

स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, विजय पाटकर, वैजयंती आपटे, मिलिंद इंगळे यांनी परीक्षणाची धुरा सांभाळली. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' सोहळ्यात 'या' मालिकेने पटकावला महाराष्ट्राची महामालिकेचा मान
Star Pravah Parivaar Puraskar 2024Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 8:26 AM

मुंबई : 19 मार्च 2024 | ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2024’ नुकताच जल्लोषात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे चौथं वर्ष होतं. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा होता. या सोहळ्यात महाराष्ट्राची महामालिका हा मान ‘ठरलं तर मग’ला मिळाला. प्रेक्षकांनी केलेल्या भरघोस मतदानाच्या माध्यमातून ‘ठरलं तर मग’ला महामालिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्याचा मान महामालिकेसाठी व्होट करणाऱ्या तीन भाग्यवान प्रेक्षकांना देण्यात आला. मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार देण्यात आला.

आपल्या खुमासदार सूत्रसंचलनाने संपूर्ण महाराष्ट्रात धिंगाणा घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवला महाराष्ट्राचा धमाका या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील सिंधू महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व ठरली. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी आणि युवराज हे ‘महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी’ ठरले.

हे सुद्धा वाचा

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार ‘मुरांबा’ मालिकेतील रमाने पटकावला. तर ‘अबोली’ मालिकेतील अबोलीची सासू म्हणजेच रमा आई सर्वोत्कृष्ट सासू ठरली. सर्वोत्कृष्ट पती ठरला ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील सार्थक तर सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार ‘शुभविवाह’च्या भूमीला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट आई या पुरस्काराची मानकरी ठरली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अण्णा सर्वोत्कृष्ट बाबा ठरले. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कलाला सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार देण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायलीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला. तर आपल्या स्टायलिश अंदाजाने प्रेक्षकांची मन जिंकणारे नित्या-अधिराज सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी पुरस्काराचे विजेते ठरले. सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार ‘शुभविवाह’ मालिकेतील रागिणी आणि ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनी यांना विभागून देण्यात आला. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला, नयना आणि काजल यांना सर्वोत्कृष्ट भावंडांचा पुरस्कार देण्यात आला. तर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सुभेदार कुटुंब हे सर्वोत्कृष्ट परिवार ठरलं.

सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य हा पुरस्कार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सागर आणि ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेतील गुंजाला देण्यात आला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट ग्लॅमरस फेस ठरली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनी आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील मल्हार. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमासाठी वैदेही परशुरामी आणि बालकलाकार सारा पालेकरला सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.