New Serial : ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा… जुहू चौपाटीवर साकारलं भव्यदिव्य वाळूशिल्प

महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी मालिका ‘नवे लक्ष्य’ (Nave Laksha) 7 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Star Pravah pays homage to Maharashtra Police)

New Serial : ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा… जुहू चौपाटीवर साकारलं भव्यदिव्य वाळूशिल्प
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 3:22 PM

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी मालिका ‘नवे लक्ष्य’ (Nave Laksh) 7 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निमित्तानं जुहू चौपाटी येथे भव्यदिव्य वाळूशिल्प साकारून स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीनं महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला. तीन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर हे भव्यदिव्य वाळूशिल्प साकार झालं. या वाळुशिल्पाच्या उद्घाटनासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, बांद्रा पोर्ट इन्सपेक्टर मिलिंद सुर्वे यांनी खास हजेरी लावत या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं. याप्रसंगी स्टार प्रवाहच्या जनरल मॅनेजर नंदिनी सिंग, स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे, निर्माते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर आणि नवे लक्ष्य मालिकेची सर्व कलाकार मंडळी हजर होते.

मालिकेच्या माध्यमातून मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम

Nave Laksha

कमी लोकसंख्या असलेल्या देशात आकाशपाताळ एक करूनही जेव्हा गुन्हेगार सापडत नाही तेंव्हा त्या देशातील पोलिसांना मुंबई पोलिसांचे उदाहरण दिले जाते. 135 करोड लोकसंख्या असलेल्या देशात गुन्हेगार शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधणे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं. महाराष्ट्राच्या या खऱ्या सुपरहिरोंचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका असेल. स्टार प्रवाह वाहिनीवर काही वर्षांपूर्वी लक्ष्य या मालिकेतून युनिट 8 टीमची शौर्यगाथा प्रेक्षकांनी अनुभवली होती आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला होता. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा कायम मान ठेवत स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच दर्जेदार मालिका सादर करत असते. ‘नवे लक्ष्य’ हा मनोरंजनाच्या ठेव्यातील नवाकोरा अध्याय असेल. पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट ‘नवे लक्ष्य’मधून आपल्या भेटीला येईल. नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट 9 ची टीम सज्ज झाली आहे.

आदेश बांदेकर यांची प्रतिक्रीया

स्टार प्रवाह प्रस्तुत नवे लक्ष्य या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य नव्या रुपामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर येत आहे याचा आनंद आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट आपण सहकुटुंब पाहायलाच हवी. तेव्हा पाहायला विसरु नका नवे लक्ष्य ७ मार्चपासून दर रविवारी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

संबंधित बातम्या

आधी अथिया आता ‘तडप’ मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार सुनील शेट्टीचा मुलगा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Photo : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.