Salman Khan | ‘सतत काय सिडनाज-सिडनाज? सिद्धार्थ शुक्ला गेलाय’; शहनाजच्या चाहत्यांवर सलमान नाराज

सिद्धार्थ आणि शहनाजने त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. मात्र हे दोघं एकमेकांना डेट करत होते, अशी जोरदार चर्चा होती. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. 

Salman Khan | 'सतत काय सिडनाज-सिडनाज? सिद्धार्थ शुक्ला गेलाय'; शहनाजच्या चाहत्यांवर सलमान नाराज
Salman Khan, Shehnaaz Gill and Sidharth ShuklaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 10:52 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तो विविध शोजमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतोय. नुकताच तो चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर पोहोचला होता. यावेळी कॉमेडियन कपिल शर्माने सलमान आणि त्याच्या टीमला खळखळून हसवलं. मात्र एका गोष्टीमुळे सलमान शोमध्ये नाराज झाला होता. ही नाराजी त्याने स्पष्ट बोलून व्यक्त केली.

नेमकं काय आहे प्रकरण?

‘द कपिल शर्मा शो’मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान शहनाज गिलच्या चाहत्यांवर नाराज झाल्याचं पहायला मिळत आहे. शहनाजने ‘बिग बॉस 13’मध्ये भाग घेतला होता. या सिझनमधील सिद्धार्थ शुक्ला आणि तिच्या जोडीला चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली. चाहत्यांनी या दोघांना ‘सिडनाज’ असं नाव ठेवलं. आता शहनाज सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. कपिलच्या शोमध्ये शहनाजला एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्याचं उत्तर देण्याआधीच तिला सलमानने रोखलं आणि त्याने असं काही म्हटलंय, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाला सलमान खान?

“मी पाहतो की सोशल मीडियावर बरेच जण सिडनाज-सिडनाज असं म्हणत असतात. हे सिडनाज-सिडनाज काय चाललंय? सिद्धार्थ आता या जगात नाही, तो गेला आहे. तो जिथे कुठे असेल, त्याचीसुद्धा हीच इच्छा असेल की शहनाज खुश राहावी, तिच्या आयुष्यात कोणीतरी यावं, तिचं लग्न व्हावं, मुलंबाळं व्हावीत. ही आयुष्यभर अविवाहित राहणार का? तुम्ही सतत सिडनाजचा पाढा का वाचता”, असा सवाल सलमान करतो.

इतकंच नव्हे तर तो पुढे म्हणतो, “आता असं काही म्हणणाऱ्या मुलांपैकी एखाद्याला जर तिने निवडलं, तर तो आनंदाने तिला स्वीकारणार. शहनाज तू त्यांचं अजिबात ऐकू नकोस. तू तुझ्या मनाचं ऐक आणि आयुष्यात पुढे जा.” या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी सलमानला योग्य असल्याचं म्हटलंय. शहनाजने तिच्या आयुष्यात पुढे जावं, भूतकाळातल्या गोष्टींमध्ये अडकून पडू नये, अशी इच्छा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली.

सिद्धार्थ आणि शहनाजने त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. मात्र हे दोघं एकमेकांना डेट करत होते, अशी जोरदार चर्चा होती. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.