AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subhedar | ‘गदर 2’, ‘ड्रीम गर्ल 2’ला विसरा, ‘सुभेदार’ने अवघ्या दोन दिवसांत कमावले कोट्यवधी रुपये

'सुभेदार'मध्ये अभिनेते अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात स्मिता शेवाळे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Subhedar | 'गदर 2', 'ड्रीम गर्ल 2'ला विसरा, 'सुभेदार'ने अवघ्या दोन दिवसांत कमावले कोट्यवधी रुपये
SubhedarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 9:20 AM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ यांसारख्या दमदार चित्रपटांनंतर दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा असतानाच ‘सुभेदार’ने प्रेक्षकांची गर्दी आपल्याकडे खेचली आहे. या चित्रपटातून सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला आहे.

‘आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं…’ असं म्हणत अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी एक महत्त्वाचं नाव आहे. दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मोठी फौजच आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवसाच्या कमाईत 60 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. ‘सुभेदार’ने शनिवारी 1.75 कोटी रुपये कमावले. ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या चित्रपटांकडून जबरदस्त टक्कर मिळत असतानाही ‘सुभेदार’ हा चित्रपट चांगली कमाई करतोय.

‘सुभेदार’ची दोन दिवसांची कमाई-

शुक्रवार- 1.05 कोटी रुपये शनिवार- 1.75 कोटी रुपये एकूण- 2.80 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार‘ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद. या चित्रपटातून त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘सुभेदार’मध्ये अभिनेते अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात स्मिता शेवाळे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘सुभेदार’ने अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ला टाकलं मागे

सुभेदार या चित्रपटाने IMDb रेटिंगच्या शर्यतीत अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ला मागे टाकलं आहे. अजय देवगणच्या चित्रपटाला 7.5 IMDb रेटिंग आहे. तर ‘सुभेदार’ला 9.7 रेटिंग मिळाली आहे. अजयचा ‘तान्हाजी’ हा चित्रपटसुद्धा तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित होता. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.