Subodh Bhave: ‘कालसूत्र’मध्ये चित्तथरारक माईंड गेम! सुबोध भावेच्या पहिल्या वेब सीरिजचा दमदार टीझर

'कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता' (Kaalsutra Pratham Dwaar Mrityudata) असं त्याच्या या पहिल्यावहिल्या सीरिजचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजची निर्मिती स्वत: सुबोधच करणार आहे.

Subodh Bhave: 'कालसूत्र'मध्ये चित्तथरारक माईंड गेम! सुबोध भावेच्या पहिल्या वेब सीरिजचा दमदार टीझर
'कालसूत्र - प्रथम द्वार | मृत्यूदाता', सुबोध भावेची वेब सीरिजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 12:50 PM

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ‘कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता’ (Kaalsutra Pratham Dwaar Mrityudata) असं त्याच्या या पहिल्यावहिल्या सीरिजचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजची निर्मिती स्वत: सुबोधच करणार आहे. सीरिजच्या पहिल्या पोस्टरमध्ये सुबोध आणि अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) एकमेकांसमोर दिसले. जानेवारी 2023 मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या टीझरला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. ‘2020 लॉकडाऊनच्या काळात सलील देसाई यांची एक रहस्य कादंबरी वाचनात आली. ती वाचून ठरवलं की ही आपल्याला करता आली पाहिजे. आज कादंबरी वाचून दोन वर्षानंतर त्यावर आधारित मराठीमधील पहिल्या भव्य अशा वेब सीरिजची घोषणा करताना मनस्वी आनंद होतोय,’ अशी पोस्ट सुबोधने लिहिली आहे.

सुबोध भावेची पोस्ट-

‘आपल्या मराठी भाषेत एक उत्तम वेब सीरिज करावी आणि त्यात आपण काम करावं अशी खूप मनापासून इच्छा होती. रहस्य कथा हा माझ्या आवडीचा विषय. 2020 लॉकडाऊनच्या काळात सलील देसाई यांची एक रहस्य कादंबरी वाचनात आली. ती वाचून ठरवलं की ही आपल्याला करता आली पाहिजे. आज कादंबरी वाचून दोन वर्षानंतर त्यावर आधारित मराठीमधील पहिल्या भव्य अशा वेब सीरिजची घोषणा करताना मनस्वी आनंद होतोय. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या वेब सीरिजचं पहिलं पोस्टर प्रकाशित करतोय. नवीन वर्षात जानेवारी 2023 मध्ये ही वेब मालिका तुम्हाला पाहायला मिळेल. हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांचा हातभार आहे, निखिल साने, मंजिरी भावे आणि ज्योती देशपांडे (जिओ स्टुडिओ), तसंच माझ्या पडद्यावरील आणि पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. एक चित्तथरारक माईंड गेम! एक विकृत सिरियल किलर आणि एक कर्तबगार पोलिस अधिकारी.. जिओ स्टुडिओज घेऊन येत आहे मराठीतला पहिलाच थरारक आणि रोमांचकारी ॲक्शन थ्रिलर वेब शो.. ‘कालसूत्र – प्रथम द्वार | मृत्यूदाता’,’ अशी पोस्ट सुबोधने लिहिली.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

सुबोध गेल्या काही दिवसांपासून ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतोय. ‘कालसूत्र’ या वेब सीरिजमधून सुबोधच्या अभिनयाचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या सीरिजच्या टीझरवर नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.