AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमाचा वर्षाव करणारा सुकेश आता जॅकलीनच्या पाठीत खुपसतोय खंजीर

मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण आता आरोपी सुकेश चंद्रशेखरने तिच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याचसोबत त्याने तिच्याविरोधात सर्व पुरावे उघड करण्याची थेट धमकीच दिली आहे.

प्रेमाचा वर्षाव करणारा सुकेश आता जॅकलीनच्या पाठीत खुपसतोय खंजीर
जॅकलिन फर्नांडिसImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 3:01 PM

नवी दिल्ली : 26 डिसेंबर 2023 | 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आतापर्यंत तिहार तुरुंगातून सतत जॅकलीना प्रेमपत्र पाठवत होता. त्याच्या प्रत्येक पत्रातून त्याने जॅकलीनविषयीचं प्रेम व्यक्त केलं. आता तोच सुकेश जॅकलीनवर उलटला आहे. यामागचं कारण म्हणजे सुकेशविरोधात जॅकलीनने हायकोर्टात दाद मागितली होती. सुकेशच्या पत्रांना वैतागून तिने हे पाऊल उचललं होतं. त्याबदल्यात आता सुकेशनेही जॅकलीनवर निशाणा साधला आहे. त्याने तिच्याविरोधात अर्ज लिहून जॅकलीनच्या अडचणीत वाढ केली आहे. जॅकलीनवर आतापर्यंत प्रेमाचा वर्षाव करणारा सुकेश तिच्याविरोधात पावलं उचलत आहे.

जॅकलीनने तिच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळण्याची याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. सुकेशने तिला याप्रकरणी फसवल्याचा आरोप तिने या याचिकेत केला होता. त्यानंतर सुकेशकडून एका पत्राद्वारे जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. तुझ्याविरोधातील सर्व पुरावे, चॅट्स, स्क्रिनशॉट्स, रेकॉर्डिंग्स सर्वांसमोर उघड करेन, अशी धमकीच सुकेशने जॅकलीनला दिली आहे. आतापर्यंत मी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण यापुढे करणार नाही, असंही त्याने म्हटलं होतं.

आता सुकेशकडून दाखल केलेल्या अर्जात त्याने जॅकलीनविरोधात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या वर्षापासून तिला पत्र मिळत असताना तेव्हा कोर्टात दाद का मागितली नाही, असा सवाल त्याने केला आहे. “जॅकलीनला माझ्याकडून पाठवण्यात आलेल्या एकाही पत्रात जर धमकी किंवा इशारा देण्याचा उल्लेख असेल तर मी कोणतीही शिक्षा स्वीकारण्यास तयार आहे”, असंही त्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

200 कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं नाव डिसेंबर 2021 मध्ये समोर आलं होतं. त्यानंतर ईडीच्या चौकशीत जॅकलीनलाही आरोपी ठरवलं गेलं. याप्रकरणात तिची अनेकदा चौकशी झाली. जॅकलीन आणि सुकेश हे रिलेशनशिपमध्ये होते. त्याने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप जॅकलीनवर आहे.

तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचे जबाब नोंदवले गेले होते. या दोघींनी सुकेश आणि त्याची सहकारी पिंकी ईराणीवर गंभीर आरोप केले होते. पिंकीच्या मदतीनेच सुकेश लोकांना फसवतो असा खुलासा जॅकलीन आणि नोराने केला होता. जॅकलीनने तिच्या जबाबात म्हटलं होतं, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली.”

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.