सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात
आजोबा झाल्यानंतर सुनील शेट्टी भावुक झाला आहे. लेक अथियासाठी त्याने खास पोस्ट शेअर केली असून एका शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकताच आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकलेचे आगमन झाले आहे. 24 मार्च 2025 रोजी अथियाने एका मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अथिया आणि केएल राहुलने आनंदाची बातमी सांगितली आहे. त्यानंतर अथियाचे वडील, अभिनेते सुनील शेट्टी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे.
एक मूल कुटुंबासाठी नेहमी आनंद घेऊन येते. खास करून मुली. भारतात मुलीला लक्ष्मी देवी मानले जाते आणि बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी आपल्या नातीच्या जन्मानंतर खूप आनंदी झाले आहेत. अथियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच सुनील शेट्टी यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी हार्ट आणि दृष्ट लागू नये म्हणून डोळ्याचा इमोजी वापरला आहे. अथियाचा भाऊ अहानने देखील कमेंट करत या इमोजीचा वापर केला आहे.
वाचा: ‘तो BJP जॉईन करतोय’, रितेश देशमुखचा मंत्रालयाच्या बाहेरील फोटो पाहून मुंबईकर आवाक




24 मार्च 2025 रोजी अथियाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिने पती केएल राहुलसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तलावातील दोन हंसांचे सुंदर चित्र होते. हे फोटो शेअर करत, ’24-3-2025 रोजी आमच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. अथिया आणि राहुल’
सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया
‘डान्स दिवाने’ या रिॲलिटी शोमध्ये सुनील शेट्टीने पुढच्या सीझनमध्ये नातवंडांसोबत येणार असल्याचे सांगून चांगलीच खळबळ उडवून दिली. या शओमध्ये आजोबा आजीचा विशेष भाग होता. या भागात सुनील शेट्टीने पुढच्या सिझनमध्ये नातवंडांसोबत येणार असल्याचे सांगितले. भारतीने सुनीलला सांगितले की, जेव्हा तो आजोबा होईल तेव्हा त्याला चांगले वागावे लागेल कारण कोणतेही मूल इतके गुड लुकींग आजी-आजोबांना हाताळू शकत नाही. यावर सुनील म्हणाला, ‘हो, पुढचा सिझन आल्यावर मी आजोबासारखा स्टेजवर फिरेन.’