जावई केएल राहुलशी पहिली भेट कशी-कुठे झाली? ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनील शेट्टी यांनी सांगितला किस्सा

सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांची पहिली भेट 2019 मध्ये झाली होती. ही भेट कशी झाली, याविषयीचा खुलासा त्यांनी नुकत्याच एका शोमध्ये केला. 'द कपिल शर्मा शो'मध्ये सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली होती.

जावई केएल राहुलशी पहिली भेट कशी-कुठे झाली? 'द कपिल शर्मा शो'मध्ये सुनील शेट्टी यांनी सांगितला किस्सा
Suniel Shetty, KL Rahul and Athiya ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 2:40 PM

मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलशी 23 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला अथिया आणि राहुलचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांची पहिली भेट 2019 मध्ये झाली होती. ही भेट कशी झाली, याविषयीचा खुलासा त्यांनी नुकत्याच एका शोमध्ये केला. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली होती. याच शोमध्ये त्यांनी पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.

“माझी राहुलशी पहिली भेट एअरपोर्टवर झाली होती. तोसुद्धा माझं मूळ गाव मँगलोरचा आहे, हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. मी त्याचा खूप मोठा चाहता होतो आणि तो चांगली कामगिरी करत असल्याचं पाहून मला आनंद झाला. जेव्हा मी घरी आलो आणि अथिया आणि मानाला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ते फार काही म्हणाले नाहीत. त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं होतं. नंतर, माना माझ्याजवळ आली आणि तिने सांगितलं की अथिया आणि राहुल एकमेकांशी बोलत आहेत”, असं सुनील शेट्टी यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by KL Rahul? (@klrahul)

अथिया आणि राहुल एकमेकांना ओळखतात आणि ते एकमेकांशी बोलत असल्याचं समजल्यावर त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. याविषयी ते पुढे म्हणाले, “अथियाने त्याचा उल्लेख माझ्याकडे केला नाही, याचं मला जरा आश्चर्य वाटलं. त्याचवेळी मी खुश होतो, कारण अथियाने दाक्षिणात्य मुलांशी मैत्री करावी अशी माझी इच्छा होती. राहुलचं मँगलोरमधील घर हे मुल्की या माझ्या जन्मस्थळापासून काही किलोमीटरच दूर आहे. त्यामुळे हा अत्यंत आनंदी योगायोग होता.”

23 जानेवारी रोजी सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये अथिया आणि राहुल लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला मोजके पाहुणे उपस्थित होते. अथिया आणि राहुल सध्या इन्स्टाग्रामवर या लग्नसोहळ्याचे आणि त्यापूर्वी पार पडलेल्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आयपीएल सिझननंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याची माहिती सुनील शेट्टी यांनी दिली.

एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राहुल आणि अथिया यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांमधील मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. अथियाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित राहुलने त्याचं प्रेम जाहीर केलं होतं.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.