Suniel Shetty | ‘मला माझ्या मुलांना भारतीय शाळांमध्ये पाठवायचं नव्हतं, कारण…’, सुनिल शेट्टीच्या वक्तव्यामुळे सर्व खळबळ

मुलांच्या शिक्षणासाठी सुनिल शेट्टी याने भारतीय शाळा का निवडल्या नाहीत? अभिनेत्याने सांगितलेलं कारण ऐकून तुम्हीही म्हणाल... सर्वत्र खळबळ

Suniel Shetty | 'मला माझ्या मुलांना भारतीय शाळांमध्ये पाठवायचं नव्हतं, कारण...', सुनिल शेट्टीच्या वक्तव्यामुळे सर्व खळबळ
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 9:56 AM

मुंबई | अभिनेता सुनिल शेट्टी सध्या एका मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा सुरु आहे. भारतीय शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी सुनिल शेट्टी तयार नव्हता. याचं कारण अभिनेत्याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. परदेशात मुलांना शिकवायचं आहे म्हटल्यानंतर प्रचंड खर्च येणार याची कल्पना अभिनेत्याला होती. पण सुनिल शेट्टी याच्या वडिलांनी देखील नातवंडांच्या शिक्षणासाठी अधिक खर्च येणार याबद्दल अभिनेत्याला सांगितलं होतं. मुलांना परदेशात  शिक्षणासाठी पाठवायचं यामागचं कारण देखील अभिनेत्याने नुकताच झालेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. सध्या सर्वत्र सुनिल शेट्टी आणि अभिनेत्याच्या मुलांच्या शिक्षणाची चर्चा सुरु आहे.

सुनिल शेट्टी म्हणाला, ‘मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की, मी माझ्या मुलांना भारतीय शाळांमध्ये पाठवणार नाही. माझ्या मुलांनी अमेरिकेतील बोर्ड स्कूलमध्ये शिकावं अशी माझी इच्छा होती. मुलांसाठी उत्तम शिक्षक मला हवे होते. माझ्या मुलांना खास वागणूक मिळावी असं मला वाटत होतं. ते सेलिब्रिटीची मुलं आहेत… हे प्रत्येकाला कळायला हवं होतं… ‘

पुढे अभिनेता म्हणाला, ‘माझे वडील देखील म्हणाले होते मुलांसाठी प्रचंड पैसे खर्च करावे लागतील.’ एवढंच नाही तर अभिनेत्याने लेक अथिया शेट्टी हिच्या शिक्षणाबद्दल देखील मोठा खुलासा केला. ‘अथियाच्या ऍडमिशनसाठी आम्ही परदेशात गेलो होतो. सर्व काही अगदी मनासारखं झालं. अथिला हिला कॉलेज देखील आवडलं. पण तेथून परतत असतात, अथियाने मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली..’

‘अथिया म्हणाली, मला कॉलेज सर्वकाही आवडलं आहे. पण मी आनंदी नाही.. त्यावर तिला विचारलं काय झालं आहे, तेव्हा अथिया म्हणाली मला बॉलिवूमध्ये काम करायचं आहे… मला तिचा निर्णय आवडला.. पण तेव्हा मी माझ्या मुलीला सांगितलं.. बॉलिवूडमध्ये तुला अपयशाचा स्वीकार करावा लागेल.. कारण त्या क्षेत्रात प्रचंड तणाव आहे… आजचा प्रत्येक शुक्रवार माझ्यासाठी अवघड असतो..’ असं देखील सुनिल शेट्टी म्हणाला.

सुनिल शेट्टी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘बलवान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ सिनेमातून अभिनेत्याला लोकप्रियता मिळाली. आता सुनिल शेट्टी लवकरच ‘हंटर तुडेगा नाही तोडेगा..’ या वेब सीरिजच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.