Sunil Grover: सुनील ग्रोवरला काय झालं? कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर विकतोय दूध

कॉमेडियन सुनील ग्रोवरवर आली दूध विकण्याची वेळ? फोटो पाहून चाहते अवाक्!

Sunil Grover: सुनील ग्रोवरला काय झालं? कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर विकतोय दूध
Sunil GroverImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 11:52 AM

नवी दिल्ली: कॉमेडियन सुनील ग्रोवर सध्या कोणत्याच कॉमेडी शोमध्ये सहभागी नाही, मात्र चाहत्यांचं मनोरंजन कसं करावं हे त्याला बरोबर ठाऊक आहे. सोशल मीडियावर तो विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याचे हे फोटो पाहून कधी नेटकऱ्यांना हसू अनावर होतं, तर कधी ते आश्चर्यचकीत होतात. सुनीलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला नवीन फोटो पाहून चाहते पुन्हा एकदा अवाक् झाले आहेत.

इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये सुनील एका बाईकवर बसून दूध विकताना पहायला मिळतोय. त्याच्या बाईकला दोन्ही बाजूंनी दुधाचे कंटेनर बांधलेले दिसत आहेत. कडाक्याच्या थंडीत त्याने जॅकेट, स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली आहे. सुनीलला रस्त्यावर दूध विकताना पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

सुनीलच्या या फोटोवर काही मजेशीर प्रतिक्रियासुद्धा येत आहेत. ‘दूध मांगोगे तो खीर देंगे.. दूध फट गया तो पनीर देंगे’, असं अभिनेत्री चारू मलिकने मस्करीत लिहिलं आहे. तर ‘दुधात पाणी किती मिसळलंस’ असा मजेशीर सवाल दुसऱ्या युजरने केला.

सुनीलला ‘द कपिल शर्मा शो’मधून बरीच लोकप्रियता मिळाली. सुनीलच्या कॉमिक टायमिंगचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जातं. कॉमेडीशिवाय त्याने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. ‘तांडव’ या वेब सीरिजमध्येही तो झळकला होता.

काही दिवसांपूर्वी सुनीलचा रस्त्यावर शेंगदाणे विकतानाचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. रस्त्याच्या कडेला त्याला शेंगदाणे विकताना पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली होती. सुनीलवर अशी वेळ का आली, असा सवाल चाहत्यांनी केला होता. कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर त्याच्यावर शेंगदाणे विकण्याची वेळ आली, असंही काहींनी म्हटलं होतं.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.