Sunny Deol | इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर पहिल्यांदाच व्यक्त झाला सनी देओल; म्हणाला “स्वत:च्या मुलासाठी..”

सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'गदर 2' हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे.

Sunny Deol | इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर पहिल्यांदाच व्यक्त झाला सनी देओल; म्हणाला स्वत:च्या मुलासाठी..
Sunny Deol Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:38 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यानिमित्त एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर मोकळेपणे व्यक्त झाला. सनी देओलचे वडील धर्मेंद्र हे अभिनेते नसते तर काय केलं असतं, असा प्रश्न त्याला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माहीत नाही, वडील जिथे असते, त्यांनी जे केलं असतं तेच मीसुद्धा केलं असतं. मी इंडस्ट्रीत अभिनेता बनलो नसतो तरी माझ्या वडिलांनी जे काही केलं त्याचंच मी पालन केलं असतं. किंबहुना वडिलांना आपल्या मुलासाठी काही करायचं असेल तर त्यात काहीच गैर नाही.”

बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यास विचारलं असता तो पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की हे सर्व असेच लोक पसरवतात, जे त्यांच्या आयुष्यात निराश आहेत. ते लोक ही गोष्ट समजत नाहीत की जर एक पिता त्याच्या मुलासाठी काही करत असेल तर त्यात गैर काहीच नाही. असं कोणतं कुटुंब आहे, जिथे वडील मुलाची मदत करत नाहीत? जे खरंच त्यांच्या मुलासाठी काही करू इच्छितात, त्यात चुकीचं काय आहे? मात्र यशस्वी तर तो स्वत:च्या कर्तृत्वाने बनू शकतो.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

“माझ्या वडिलांनी मला अभिनेता बनवलं नाही. मी माझ्या मुलाला अभिनेता बनवलं नाही. वडील इतके मोठे स्टार आहेत आणि मी माझी स्वत:ची ओळख स्वत: बनवली. माझ्या कर्तृत्त्वावर आज मी याठिकाणी आहे. मी माझ्या वडिलांसारखा नाही, पण आमच्यात बरंच काही साम्य आहे”, असंही तो पुढे म्हणाला.

सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचंही दिग्दर्शन अनिल शर्मा यांनीच केलं आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.