AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | ‘गदर 2’ला अँटी-पाकिस्तान म्हणणाऱ्यांना सनी देओलचं सडेतोड उत्तर; म्हणाला “हे सर्व राजकीय..”

'गदर 2'वर होत असलेल्या 'अँटी पाकिस्तानी' टीकेवर बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला, "हे पहा, मुळात ही एक राजकीय गोष्ट आहे. प्रत्यक्षात याला लोकं, विशेषकरून प्रामाणिक लोकं विरोध करत नाहीयेत. कारण अखेर त्यात माणुसकीच आहे."

Gadar 2 | 'गदर 2'ला अँटी-पाकिस्तान म्हणणाऱ्यांना सनी देओलचं सडेतोड उत्तर; म्हणाला हे सर्व राजकीय..
Sunny Deol Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 8:29 AM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : सनी देओलचा बहुचर्चित ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. मात्र त्याचसोबत काहींनी हा चित्रपट ‘अँटी-पाकिस्तान’ असल्याचीही टीका केली. या टीकेवर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने प्रतिक्रिया दिली आहे. “हे सर्व राजकारण केलं जातंय, तुम्ही चित्रपटाला इतक्या गंभीरतेने घेऊ नका”, असं तो म्हणाला. ‘गदर 2’ हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. यामध्ये भारतीय तारा सिंग आणि पाकिस्तानची सकिना यांच्यातील प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती.

काय म्हणाला सनी देओल?

‘गदर 2’वर होत असलेल्या ‘अँटी पाकिस्तानी’ टीकेवर बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला, “हे पहा, मुळात ही एक राजकीय गोष्ट आहे. प्रत्यक्षात याला लोकं, विशेषकरून प्रामाणिक लोकं विरोध करत नाहीयेत. कारण अखेर त्यात माणुसकीच आहे. मग ते इथे असो किंवा तिथे (पाकिस्तान), प्रत्येकजण सोबत आहे. तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यात मी कोणालाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला नाही. कारण लोकांना कमी लेखण्यावर माझा विश्वास नाही. किंबहुना गदरमधील तारा सिंग हा तसा माणूसच नाही.”

‘गदर 2’वरून होणाऱ्या राजकारणाबद्दल काय म्हणाला सनी देओल?

राजकीयदृष्ट्या तणावपूर्ण वातावरणात ‘गदर 2’ प्रदर्शित करण्याबद्दल प्रश्न विचारला असता सनी पुढे म्हणाला, “आपल्या सर्वांनाच शांती हवी आहे. हे सर्व घडावं अशी कोणाचीच इच्छा नाही. पण राजकारण्यांनी आता जगाकडे केवळ मतांच्या दृष्टीकोनातून न बघण्याची वेळ आली आहे. कारण प्रत्येकजण हे सर्व केवळ मतांसाठीच करतो. या चित्रपटाला इतक्या गांभीर्याने घेऊ नका. चित्रपट हा मनोरंजनासाठी असतो. त्याचा इतर कोणताही दृष्टीकोन नसतो. अर्थातच चित्रपटात काही भूमिका आणि संवाद अतिशयोक्ती वाटतात, कारण प्रेक्षकांना अशीच पात्रं हवी असतात. जर ते तसे नसतील, तर प्रेक्षकांना आनंद मिळत नाही. कारण एखादी व्यक्ती वाईट असेल तर त्याला तुम्ही नकारच देता आणि एखादी व्यक्ती चांगली असेल तर तुम्हाला त्यात चांगलंच पहायचं असतं. हे चित्रपटाचं एक विशिष्ट क्षेत्र आहे.”

हे सुद्धा वाचा

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओलसोबतच अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 438.7 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.