Sunny Deol | ‘हा तर जया बच्चनचा पुरुषी व्हर्जन’; सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर ओरडल्याने सनी देओल ट्रोल

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'इतका अहंकार बरा नव्हे' असं एकाने लिहिलं आहे. तर 'हा जया बच्चनचा पुरुषी व्हर्जन आहे' असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. 'योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाचा अहंकार मोडतो', असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

Sunny Deol | 'हा तर जया बच्चनचा पुरुषी व्हर्जन'; सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर ओरडल्याने सनी देओल ट्रोल
Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 10:17 AM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : आजवर ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना नेहमीच पापाराझींसमोर आणि चाहत्यांसमोर भडकताना पाहिलं गेलं आहे. जया बच्चन यांना त्यांचे फोटो क्लिक केलेले आणि त्यांच्यासोबत सेल्फी केलेलं आवडत नाही. म्हणूनच कॅमेरासमोर त्या नेहमी चिडलेल्या दिसतात. मात्र असाच काहीसा स्वभाव नुकताच अभिनेता सनी देओलचा पहायला मिळाला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील त्याची वागणूक पाहून नेटकरी त्याची तुलना जया बच्चन यांच्याशी करत आहेत. सनी देओलचा हा व्हिडीओ एअरपोर्टवरील असून एक चाहता त्याच्यासमोर सेल्फी क्लिक करण्यासाठी येतो. त्याच वेळी सनी असं काही बोलतो, ज्यामुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सनी देओल आणि त्याच्या आजूबाजूला असलेले सुरक्षारक्षक एअरपोर्टवरून बाहेर निघत असतात. त्याचवेळी एक चाहता त्याच्याजवळ सेल्फी क्लिक करण्यासाठी येतो. सनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उभा देखील राहतो. मात्र त्या चाहत्याला पटकन सेल्फी क्लिक करता येत नसल्याने सनी देओल त्याच्यावर ओरडतो. ‘घे ना सेल्फी’ असं सनी ओरडतो आणि त्यानंतर सुरक्षारक्षक त्या चाहत्याला बाजूला करतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘इतका अहंकार बरा नव्हे’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हा जया बच्चनचा पुरुषी व्हर्जन आहे’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाचा अहंकार मोडतो’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

सनी देओल सध्या ‘गदर 2’ला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे यशाच्या शिखरावर आहे. या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत कमाईचा 250 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटाच्या यशानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कतरिना कैफवरही निशाणा साधला होता. त्यावरूनही त्याला ट्रोल केलं गेलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.