Gadar 2 | “..अन् सनी देओल फोनवरच रडू लागला”; ‘गदर 2’च्या दिग्दर्शकांनी सांगितला प्रसंग

'गदर 2' हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती.

Gadar 2 | ..अन् सनी देओल फोनवरच रडू लागला; 'गदर 2'च्या दिग्दर्शकांनी सांगितला प्रसंग
अमीषा पटेल, सनी देओलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 1:25 PM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. ज्या दिवशी हा चित्रपट देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा नेमक्या काय भावना होत्या याविषयी दिग्दर्शक अनिल शर्मा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाले. 11 ऑगस्टची सकाळ ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी आणि व्हिडीओंनी झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी फोनवर सनी देओलसोबत झालेल्या भावनिक संवादाचीही आठवण त्यांनी सांगितली. अनिल शर्मा यांच्याशी बोलताना सनी देओलला अश्रू अनावर झाले होते.

झी स्टुडिओने ‘गदर 2’चे मध्यरात्री 3 वाजताचे काही शोज आयोजित केले होते. त्यामुळे प्रदर्शनाच्या दिवशी पहाटेपासूनच सोशल मीडियावर या चित्रपटाचे रिव्ह्यूज आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया व्हायरल होऊ लागल्या होत्या. “मला माझ्या पत्नीने उठवलं आणि सुरुवातीच्या सर्व प्रतिक्रिया सकारात्मक असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर प्रेक्षकांचे व्हिडीओ पाहून मी थक्क झालो होतो. झोपेतून उठून पुढील एक-दोन तास मी तेच व्हिडीओ पाहत होतो”, असं ते म्हणाले.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर त्यांनी सनी देओलला फोन केला. तेव्हा सनी त्यांच्याशी बोलताना फार भावूक झाला होता. याविषयी अनिल शर्मा म्हणाले, “मी त्याला पहिल्यांदा रडताना ऐकलं होतं. तो म्हणाला, शर्माजी.. आपण करून दाखवलं. सनी देओलला फोनवर रडताना ऐकून माझे आणि माझ्या पत्नीचेही डोळे पाणावले होते. तो क्षण खूप भावनिक होता.”

हे सुद्धा वाचा

‘गदर 2’ हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 420 कोटी रुपये कमावले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेलसोबत उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनिष वाधवा आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जवळपास 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनल्याचा खुलासा अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीत केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.