सवत्र बहिणीच्या घटस्फोटाच्या चर्चा तर, सनी देओल यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण, कारण…

Sunny Deol family : ईशा देओल हिचा 12 वर्षांचा संसार मोडणार? हेमा मालिनी यांच्या कुटुंबात अडचणी, तर सनी देओल यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण; कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबाच्या चर्चा...

सवत्र बहिणीच्या घटस्फोटाच्या चर्चा तर, सनी देओल यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण, कारण...
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 9:30 AM

मुंबई | 19 जानेवारी 2024 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्राचा 12 वर्षांचा संसार संकटात आहे.. असं सांगितलं जात आहे. ईशा लवकरच पती भरत तख्तानी याच्या सोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांचं कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करताना दिसत आहे. तर दुसरीकडे अभिनेते सनी देओल आणि त्यांचं कुटुंब मात्र आनंदात आहे. देओल कुटुंबत सनई-चौघडे वाजणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबांची चर्चा रंगली आहे.

सनी देओल यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. कुटुंबातील महत्त्वाच्या सदस्याचं लग्न आहे. म्हणून धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब घरात लग्न असल्यामुळे आनंदी आहेत. रिपोर्टनुसार सनी देओल कडेकोट बंदोबस्तात उदयपूरच्या महाराणा प्रताप डबोक विमानतळावर पोहोचले, तिथे त्याचं स्वागत करण्यात आलं. यानंतर सनी थेट विवाहस्थळी पोहोचले. यावेळी सनी देओल यांनी इव्हेंट कंपनीसोबत लग्न विधी आणि इतर कार्यक्रमांवर चर्चा केली. त्यानंतर सनी देओल शुक्रवारी रात्री 8 वाजता पुन्हा मुंबईत पोहोचले.

देओल कुटुंबात कोणाचं आहे लग्न?

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओल यांच्या बहिणीची मुलगी म्हणजे अभिनेत्याच्या भाचीचं लग्न आहे. 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नाचे विधी होऊ शकतात. सनी देओलचे वडील धर्मेंद्र, हेमा मालिनी, बॉबी देओल, ईशा देओल यांच्यासह कुटुंबातील सदस्यही लग्नसमारंभात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब

धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब लाईम-लाईट पासून कायम दूर असतं. पण त्यांच्या कुटुंबाची चर्चा कायम रंगलेली असते. अनेक वर्षांपूर्वी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नावर नाराजी देखील व्यक्त केली होती.

धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.