AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा वर्षांच्या शाहिद कपूरची सावत्र आईशी पहिली भेट कशी होती? सुप्रिया पाठक यांच्याकडून खुलासा

अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांनी 1988 मध्ये लग्नगाठ बांधली. सुप्रिया या पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. ज्यावेळी सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांनी लग्न केलं, तेव्हा शाहिद फक्त सहा वर्षांचा होता. शाहिद कपूर हा पंकज कपूर आणि त्यांची पहिली पत्नी नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे.

| Updated on: Oct 03, 2023 | 4:47 PM
अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांनी 1988 मध्ये लग्नगाठ बांधली. सुप्रिया या पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रिया त्यांच्या लग्नाबद्दल आणि सावत्र मुलगा शाहिद कपूरबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या.

1 / 5
पंकज कपूर यांच्याशी लग्नाबद्दलची गोष्ट जेव्हा सुप्रिया यांनी त्यांच्या घरात सांगितली, तेव्हा त्यांची आई आणि दिग्गज अभिनेत्री दीना पाठक या लग्नाविरोधात होत्या. दीना पाठक यांना नेहमी असा संशय असायचा की पंकज कपूर हे एके दिवशी सुप्रिया यांना सोडून जातील.

2 / 5
“आई गेल्या काही वर्षांपर्यंत लग्नाबद्दल माझे विचार बदलण्याचा प्रयत्न करायची. तोपर्यंत मी दोन मुलांची आईसुद्धा झाली होती. मात्र तरीसुद्धा तिला संशय होता की पंकज कपूर मला एकेदिवशी सोडून जातील. त्यावर मी त्यांना म्हणायचे, ठीक आहे. जे होईल ते मी सांभाळून घेईन”, असं सुप्रिया यांनी सांगितलं.

3 / 5
सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांचं लग्न झालं, तेव्हा शाहिद फक्त सहा वर्षांचा होता. त्याच्याशी झालेल्या पहिल्या भेटीविषयी सुप्रिया पाठक म्हणाल्या, "तो अत्यंत निरागस आणि प्रेमळ मुलगा होता. माझी त्याच्याशी पहिली भेट झाली, तेव्हा त्याची किंवा माझी नेमकी अशी कोणती प्रतिक्रिया नव्हती. मात्र पहिल्याच भेटीत आमची बाँडींग चांगली झाली होती."

4 / 5
शाहिद कपूर हा पंकज कपूर आणि त्यांची पहिली पत्नी नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे. पंकज आणि नीलिमा यांनी 1984 मध्ये घटस्फोट घेतला होता. आज सुप्रिया यांचं शाहिद आणि त्याच्या दोन्ही मुलांशी खूप चांगलं नातं निर्माण झालं आहे. शाहिद कुटुंबाला खूप महत्त्व देतो, असंही त्या म्हणाल्या.

5 / 5
Follow us
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.