लग्नाच्या काही महिन्यांतच अभिनेत्रीला पश्चात्ताप; म्हणाली “दररोज रात्री मी रडत..”
'इश्कबाज' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी चंदना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. 13 वर्षे डेट केल्यानंतर तिने करण शर्माशी लग्न केलं. सात महिन्यांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधली.
‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. 2 मार्च 2024 रोजी तिने बॉयफ्रेंड करण शर्माशी लग्न केलं. सुरभी आणि करण हे लग्नापूर्वी जवळपास 13 वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुरभी तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘कपल ऑप थिंग्स’ या पॉडकास्टमध्ये सुरभीला तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की 13 वर्षे करणसोबत रिलेशनशिपमध्ये राहूनही लग्नानंतरचे अनेक रात्र तिने रडत काढले आहेत. आता कुठे तिचं तिचं वैवाहिक आयुष्य नॉर्मल झाल्याचं तिने सांगितलं आहे.
या मुलाखतीत सुरभी म्हणाली, “जेव्हा करणसोबत माझं लग्न केलं, तेव्हा सुरुवातीला दोन महिन्यांपर्यंत मी दररोज रात्री रडत बसायची. मी सतत रडत असे किती रात्र घालवले मलाच माहीत नाही. आम्ही दोघांनी 13 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. आमच्या लव्ह-लाइफमध्ये बरेच चढउतार आले होते. पण जेव्हा आम्ही लग्न केलं आणि 24 तास एकमेकांसोबत राहू लागलो, तेव्हा आम्हाला समजलं की डेटिंग आणि वैवाहिक आयुष्य खूप वेगळं असतं.”
View this post on Instagram
“मी काहीच मॅनेज करू शकत नव्हती. माहेरी तर सर्वकाही आईवडील सांभाळून घ्यायचे. माझ्यावर फारशी कसली जबाबदारी नव्हती. पण लग्नानंतर सर्वकाही मी एकटी कसं सांभाळेन, हे मला माहीत नव्हतं. दररोज रात्री मी यामुळे रडत बसायची. कारण मला आईवडिलांशिवाय राहण्याची सवय नव्हती. मला माहेरच्या लोकांची खूप आठवण यायची. अशा परिस्थितीत करणने मला खूप सांभाळलं होतं. मी रडायला लागेल की तो मला समजवायचा आणि मला आईवडिलांशी भेटायला घेऊन जायचा. आता कुठे सर्वकाही ठीक झालंय. आता मी सर्वकाही सांभाळून घेते. पण सुरुवातीला मला असं वाटत होतं की मी लग्नच का केलं”, अशा शब्दांत सुरभी व्यक्त झाली.
सुरभीने ‘इश्कबाज’, ‘नागिन 5’ या मालिकांमध्ये काम केलंय. 2009 मध्ये तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत स्विटीची भूमिका साकारत अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘कुबूल है’ या मालिकेत तिला पहिली मुख्य भूमिका मिळाली होती. ‘संजीवनी’ आणि ‘शेरदिल शेरगील’ या मालिकांमध्येही तिने काम केलंय.