समजावलं होतं नको करूस.. विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सुरेश ओबेरॉय यांनी सोडलं मौन

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | अभिनेते सुरेश ओबेरॉय हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्यांनी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत, ते बऱ्याच वर्षांनंतर मुलगा विवेक ओबेरॉयच्या ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाले. विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपविषयी मला काहीच […]

समजावलं होतं नको करूस.. विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सुरेश ओबेरॉय यांनी सोडलं मौन
ऐश्वर्याबद्दल विवेक माझ्याकडे.. सुरेश ओबेरॉय यांच्याकडून खुलासाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 8:36 AM

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | अभिनेते सुरेश ओबेरॉय हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्यांनी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत, ते बऱ्याच वर्षांनंतर मुलगा विवेक ओबेरॉयच्या ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाले. विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपविषयी मला काहीच माहीत नव्हतं, कारण माझ्या मुलाने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्याच नव्हत्या, असं ते म्हणाले. यासोबतच आता त्यांचं सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं नातं कसं आहेत, त्याविषयीही त्यांनी खुलासा केला.

“त्याला समजावलं होतं..”

या मुलाखतीत सुरेश ओबेरॉय म्हणाले की विवेकने त्यांना त्याच्या रिलेशनशिपविषयी काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्यांना त्या दोघांच्या नात्याविषयी कोणतीची माहिती नव्हती. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून मला विवेक-ऐश्वर्याबद्दल समजलं होतं, असंही ते म्हणाले. ‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या या मुलाखतीत ते पुढे म्हणाले, “बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या. विवेकने मला कधीच त्या सांगितल्या नव्हत्या. राम गोपाल वर्माकडून मला ही गोष्ट समजली होती आणि त्याआधी आणखी एका व्यक्तीकडून मला त्या गोष्टी कळाल्या होत्या. मी त्याला समजावलं होतं की असं काही करू नकोस.”

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं नातं

या मुलाखतीत त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला होता की विवेकमुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर काही परिणाम झाला का? त्याचं उत्तर देताना सुरेश म्हणाले, “अमिताभ बच्चन कधीच माझे खूप चांगले मित्र नव्हते. मी फक्त त्यांचा सहकलाकार होतो. माझ्या भावाच्या निधनाच्या वेळी जया बच्चन आल्या होत्या. पण आमचं नातं इंडस्ट्रीच्या हिशोबानेच होतं. माझी मैत्री डॅनी मुकूलशीच होती. मिस्टर बच्चन यांनी मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमंत्रित केलं होतं. आम्ही जेव्हा कधी एकमेकांसमोर येतो, तेव्हा चांगलेच असतो.”

हे सुद्धा वाचा

सलमान खानबद्दल काय म्हणाले?

सलमान खानबद्दल बोलताना सुरेश ओबेरॉय म्हणाले, “सलमान जेव्हा कधी मला भेटतो, तेव्हा त्याची सिगारेट लपवतो आणि माझ्याशी खूप आदराने बोलतो. तो किंवा त्याचे वडील सलीम खान माझ्याशी खूप आदराने भेटतात आणि बोलतात. मी विवेकला नेहमीच सलीम यांच्या पायांना स्पर्श करण्यास सांगतो. मी सलीम भाई यांचा खूप आदर करतो. काही गोष्टी घडल्या, पण माझं नातं त्यांच्यासोबत चांगलं आहे.”

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय हे एकमेकांना डेट करत होते. मात्र 2003 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला होता. ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने धमकी दिल्याचा खुलासा विवेकने काही जुन्या मुलाखतींमध्ये केला होता.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.